मराठी तारकामंडळात मानाचे स्थान मिळविणाऱ्या आणि आपल्या अग्रेसर प्रतिमेने अबालवृद्धांची लाडकी बनलेल्या लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या निमित्ताने आज (मंगळवारी) रसिकांना मिळणार आहे. व्हिवा लाउंजमधून आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या तडफदार स्त्रिया भेटल्या. लाउंजच्या या नव्या पर्वात ग्लॅमरस आणि बिनधास्त सई ताम्हणकर रसिकांच्या भेटीला येत आहे.
सई ताम्हणकरच्या नावाची चर्चा तिच्या भूमिकांमुळे होतेच, पण त्याबरोबरच तिच्या फॅशन आणि स्टाइलचीसुद्धा तरुणाईला भुरळ पडते. मराठी चित्रपटसृष्टीतील खूप कमी अभिनेत्रींना त्यांच्या स्टाइलसाठी गौरवण्यात येते. त्यापैकी सई एक आहे. मराठी अभिनेत्रीला ग्लॅमरचे वलय देण्याचे काम तिने केले. मराठी चित्रपटसृष्टीबाहेरही सईला यामुळे ओळख मिळाली. स्वप्निल शिंदेसारख्या नामवंत फॅशन डिझायनर सईला त्याच्या डिझाइन्सची प्रेरणा मानतो.पडद्यावरचा सईचा आत्मविश्वासपूर्वक वावर तरुणाईला भावतो. अशा बिनधास्त, ग्लॅमरस अभिनेत्रीशी रसिकांना आज थेट संवाद साधता येईल. केसरी प्रस्तुत व्हिवा लाउंज हा कार्यक्रम दिशा डायरेक्टच्या सहकार्याने होत आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झी २४ तास या वाहिनीवरून होईल. कार्यक्रम सर्वासाठी खुला असून विनामूल्य प्रवेशिका दादरच्या सावरकर स्मारक सभागृहात उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश मिळेल.
कधी : आज ’वेळ : दुपारी ३.३०
कुठे : सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)
सईशी आज मनमोकळ्या गप्पा!
मराठी तारकामंडळात मानाचे स्थान मिळविणाऱ्या आणि आपल्या अग्रेसर प्रतिमेने अबालवृद्धांची लाडकी बनलेल्या लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर
First published on: 03-03-2015 at 03:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar in viva lounge today