Saif Ali Khan : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. तसंच या प्रकरणात बांगलादेशी हल्लेखोराला अटकही करण्यात आली. या आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची कोठडीही सुनावली. दरम्यान मुंबई पोलिसांना या प्रकरणात आरोपीची १४ दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे. त्याची कारणंही समोर आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) आरोपीला लूट करायची होती की आणखी काही?

आरोपीने प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून लूट करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हेतू हाच होता का? की आणखी काही होता? त्याला हे असं करण्यासाठी कुणी चिथावणी दिली होती का? याबाबत चौकशी करायची आहे.

२)सैफच्या घराचा पत्ता कुणी दिला?

आरोपीला सैफ अली खान याच इमारतीत राहतो, हे कुणी सांगितलं? त्याची माहिती आरोपीकडून पोलिसांना हवी आहे. त्याचप्रमाणे गुन्हा करताना घातलेले कपडे आरोपीने लपवून ठेवले आहेत. हे कपडे का लपवले त्याचं कारण पोलिसांना जाणून घ्यायचं आहे.

३) बनावट ओळख आरोपीने कशी मिळवली?

आरोपी बांगलादेशचा आहे असं पोलिसांनी आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. तो मुंबईत विजय कुमार, बिजॉय कुमार या नावांनी वास्तव्य करत होता. त्याला बनावट ओळख बनव हे कुणी सांगितलं? विजय दास हे नाव घे असं त्याला कुणी सांगितलं की ते त्याने स्वतःहून निवडलं हेदेखील पोलिसांना शोधायचं आहे.

४) आरोपी भारतात कसा आला?

सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर हा पासपोर्ट किंवा व्हिसा याशिवाय भारतात आला, अर्थातच घुसखोरी करुनच तो इथे आला. बांगलादेशातून तो भारतात कसा आला? हे पोलिसांना जाणून घ्यायचं आहे. तो कोलकाता या ठिकाणी आणि मुंबईत कुठे राहात होता ते निवास त्याला कसे मिळाले? याचंही उत्तर पोलिसांना हवं आहे.

५) बांगलादेशातून भारतात येण्यासाठी कुणी मदत केली का हे तपासणे

सैफवर हल्ला करण्यासाठी आरोपीला बांगलादेशातून येण्यासाठी कुणी मदत केली? त्याने त्याच्याकडून काही मोबदला वगैरे घेतला का? या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना जाणून घ्यायची आहेत.

हे पण वाचा- Ajit Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्याचा घटनाक्रम सांगत अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “नवा मुद्दा आला की..”

६) आरोपीला भारतात बेकायदा आश्रय कुणी दिला?

भारतात आरोपीला बेकायदा आश्रय कुणी दिला? हे देखील पोलिसांना जाणून घ्यायचं आहे.

७) बेकायदेशीर रित्या कधीपासून राहतो आहे आरोपी?

बेकायदेशीर रित्या आरोपी भारतात आला ही तारीख कुठली होती? आरोपी किती काळ बेकायदेशीर रित्या राहतो आहे हे पोलिसांना जाणून घ्यायचं आहे.

८) चाकूची खरेदी आरोपीने कुठून केली?

सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीने चाकू कुठून खरेदी केला? हे देखील पोलिसांना जाणून घ्यायचं आहे.

९) इतर साथीदारांचा सहभाग आहे का?

आरोपीला गुन्हा करण्यात आणखी कुणी साथ दिली आहे का? हेदेखील पोलिसांना जाणून घ्यायचं आहे.

१०) गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का?

आरोपीचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का? बांगलादेश किंवा इतर कुठल्याही देशात त्याचं नाव गुन्हेगार म्हणून सापडतं आहे का? हे देखील पोलिसांना जाणून घ्यायचं आहे.

या मुख्य कारणांसाठी पोलिसांना आरोपीची १४ दिवसांची कोठडी हवी आहे. तूर्तास न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan 10 reasons why mumbai police sought 14 day custody of bangladeshi man arrested for stabbing saif ali khan scj