मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास (३०) याचा बांगलादेशचा नागरिक असल्याचे ओळखपत्र व चाालक परवाना पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचा महत्त्वाचा पुरावाच पोलिसांच्या हाती लागला आहे.

सैफवर हल्ला करणार आरोपी शरिफुल ऊर्फ दास हा बांगला देशी घुसखोर असून त्याने मे महिन्यात बांगलादेश सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात प्रवेश केला होता. मेघालयात प्रवेश केल्यानंतर त्याने एका दलालाला दहा हजार दिले. त्या दलालाने त्याला आसामपर्यंत आणले आणि त्याला एक सिम कार्डही पुरवले. त्याच दलालाने त्याला कोलकात्याला जाण्यासाठी बसमध्ये बसवले. कोलकात्यात तीन दिवस राहिल्यानंतर आरोपीने मुंबईत येण्यासाठी रेल्वे पकडली. मुंबईत त्याने पुढील तीन दिवस इकडे तिकडे भटकून काढले. त्यानंतर त्याची ओळख जितेंद्र पांडे यांच्याशी झाली. पांडे याने त्याला वरळीतील एका पबमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून नोकरी लावली. मात्र गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात काही दिवसातच चोरीच्या आरोपाखाली त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

Saif ali khan attack case, Accused Shariful ,
सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे पुरावे

हेही वाचा – मुंबई : जी.टी. रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग

हेही वाचा – एमआयडीसीचे भूखंड म्हाडाकडून विकसित ? संयुक्त भागीदारी तत्त्वाबाबत लवकरच करार

Saif ali khan attack case, Accused Shariful ,
सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे पुरावे

नोकरी गमावल्यानंतर शरिफुलने चोऱ्या करण्यास सुरूवात केली. शरिफ ३१ डिसेंबरपासून खार आणि वांद्रे सारख्या उच्चभ्रू परिसरात फिरून आपले लक्ष्य शोधत होता. घरफोडी करण्यासाठी त्याने स्क्रू-ड्रायव्हर, हातोडा आणि हॅक्सॉ ब्लेड घेतले. ठाण्याच्या रेस्टॉरंटमधून चोरलेला चाकूही शरिफुल जवळ बाळगत होता, असे चौकशीत उघड झाले आहे.

Story img Loader