Saif Ali Khan Attack Case Fingerprint Twist : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात घुसून एका चोराने चाकू हल्ला केला होता. चोराने सैफवर चाकूने सहा वार केले होते. त्यानंतर सैफवर चार दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले. या हल्ल्याला आता १० दिवस उलटले आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास चालू आहे. पोलीस हल्ला प्रकरणातील पुरावे गोळा करत आहेत. या हल्ल्यानंतर सैफच्या घरातील ज्या ज्या वस्तूंवर हल्लेखोराच्या बोटांचे ठसे होते ते सर्व ठसे फॉरेन्सिक विभागाने गोळा केले होते. दरम्यान, आता या बोटांचे ठसे व अटक केलेल्या आरोपीच्या बोटाचे ठसे तपासून पाहिले असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सैफच्या घरात सापडलेले बोटांचे ठसे व आरोपी शरीफुल इस्लामच्या बोटांचे ठसे मिळतेजुळते नसल्याचं समोर आलं आहे. एनडीटीव्हीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एनडीटीव्हीच्या अहवालानुसार मुंबई पोलिसांना सैफच्या घरात सापडलेले बोटांचे ठसे सीआयडीच्या फिंगरप्रिंट्स ब्युरोकडे पाठवण्यात आलं होते. त्यानंतर समोर आलेल्या अहवालात म्हटलं आहे की सैफच्या घरात सापडलेले बोटांचे ठसे व आरोपी शरीफुलच्या बोटांचे ठसे जुळत नाहीत. सीआयडीने याबाबत पोलिसांना सूचित करताना म्हटलं आहे की चाचणीचा अहवाल नकारात्क आहे. आता मुंबई पोलीस अधिक तपास करू लागले आहेत. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान, आता आरोपी व सैफच्या घरातील बोटांचे ठसे न जुळल्यामुळे हा संशय अधिक बळावला आहे. पोलीस त्या दृष्टीने देखील तपास करू लागले आहेत.

पोलिसांच्या हाती नवे व भक्कम पुरावे

दरम्यान, अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती आणखी पुरावे लागले आहेत. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दासने (३०) गुन्ह्याच्या वेळी घातलेले बूट पोलिसांनी जप्त केले आहेत. यापूर्वी हल्ल्यात वापरलेला चाकूचा तुकडा, कपडे पोलिसांनी जप्त केले होते. शरीफुलच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असून ते न्यायवैद्याक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच आरोपी बांगलादेशचा नागरिक असल्याचे ओळखपत्र व चालक परवाना यापूर्वीच पोलिसांच्या हाती लागला आहे.