नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चित्रपटाने सध्या प्रेक्षकांना ‘याड लावलं’ आहे. चित्रपटाला सर्व स्तरांतून तुफान प्रतिसाद मिळत असतानाच चित्रपटातील पात्रांवरून विनोदांचे मेसेज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक या सध्याच्या झटपट माध्यमांमध्ये कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. पण आता ‘सैराट’वर विनोद करणाऱया मेसेजेसवर टीका करणारी एक पोस्ट दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्याच नावाने व्हायरल झाली आहे. ‘सैराट’ चित्रपटावर विनोद न करण्याचे आवाहन या मेसेजमधून करण्यात आले असून, चित्रपटातील कलाकारांसह संगीतकार अजय-अतुल यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे. मराठी अस्मितेचा धागा पकडून ‘सैराट’वर विनोदी मेसेज शेअर करणाऱयांवर शरसंधान या पोस्टमधून करण्यात आले आहे. अर्थात मेसेजचे स्वरुप पाहता तो नागराजच्या नावाने खपवला जात असल्याचे स्पष्ट कळून येते.
नागराजच्या नावाने व्हायरल झालेले मेसेज-