बंगळुरू येथे विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. बैठकीला उपस्थित राहावे म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाची बैठक पार पडली. यानंतर संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाविकास आघाडीत राहणार की एकत्र जाणार? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेची पुढल्या वाटचालीबद्दल कोणतीही शंका निर्माण होण्याची गरज नाही. शिवसेनेचं भविष्य उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उत्तम आहे. ज्यांनी आमचा पक्ष सोडला त्यांनी त्यांच्या भविष्याची चिंता करावी, अशा घडामोडी ७२ तासांत महाराष्ट्रात घडल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित होते आणि राहतील.”

हेही वाचा : VIDEO : राष्ट्रवादी काँग्रेसला किती आमदारांचा पाठिंबा? जयंत पाटील स्पष्टीकरण देत म्हणाले, “५३ पैकी…”

“आमचे पक्ष कितीही फोडण्याचा प्रयत्न केला. तरी, काही आमदार आणि खासदार फोडू शकता. पण, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा जनाधार वाढत आहे. भाजपाने राजकीय भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सरकार निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याला लोकांचा पाठिंबा नाही. जगातील आणि देशातील अत्यंत भ्रष्ट पक्ष म्हणून भाजपाची इतिहासात नोंद होईल,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना फोडून काहींना शौर्य वाटत आहे. काहीजण मास्टरस्ट्रोक वगैरे म्हणत आहेत. उद्या २०२४ ला केंद्रीय तपास यंत्रणा आमच्या हातील येतील, तेव्हा असे मास्टरस्ट्रोक काय असतात, ते दाखवू. हातात तपास यंत्रणा असल्यावर मास्टरस्ट्रोक मारणं सोप्प जातं,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा : प्रफुल्ल पटेलांकडून प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी, जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

अजित पवारांच्या सत्तेतील सहभागानंतर शिंदे गटाची ताकद कमी झाली? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “त्यांची ताकत आधीही नव्हती. गुलामांना ताकद नसते. गुलाम हा गुलाम असतो. गुलामाला स्वाभिमान, अस्मिता या भावना नसतात. ती पायपुसणी असतात. या गटाचे पायपुसणे झाले आहेत. इतके प्रचंड बहुमत असताना अजित पवारांना घेतलं. म्हणजे तुमची गरज संपली आहे, हा स्पष्ट संदेश दिला आहे.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sajay raut warning bjp mastarstroke after 2024 will back govt ssa
Show comments