साकीनाका पोलिसांनी मॉडेलवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातून नवीन धक्कादायक माहिती मिळत आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक खटापे यांनी या कथित छाप्यासाठी स्वत:ची खासगी गाडी वापरल्याची माहिती समोर आली आहे.
 एका मॉडेलवर सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप करीत साकीनाका पोलीस ठाण्याच्या तीन पोलिसांनी तिला चौकीत आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते तसेच तिच्याकडील दागिने आणि रोख रक्कम असे मिळून १० लाखांचा ऐवज लुटला होता. या प्रकरणी  साकीनाक्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक खटापे, सूर्यवंशी आणि हवालदार कोंडे यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा १० या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या कथित छाप्याच्या वेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक खटापे यांनी स्वत:ची खासगी टाटा सफारी ही गाडी वापरली होती. याच गाडीतून त्यांनी मॉडेल आणि तिच्या मित्राला संघर्ष नगर चौकीत आणले होते. सरकारी वाहन नसल्याने ही गाडी नेल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. आरोपींकडून अद्याप त्यांनी लुटलेली रक्कम हस्तगत करण्यात आली नाही. फिर्यादी मॉडेलने स्वत: कुपर रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी केली होती. आता पोलीस पुन्हा तिची वैद्यकीय तपासणी करणार आहेत. या तिन्ही पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून साकीनाक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसन्न मोरे तसेच परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर यांची बदली करण्यात आली आहे.

Gujarat man on FBI 10 Most Wanted Fugitives list
Crime News : FBIच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत गुजराती व्यक्तीचं नाव; माहिती देणाऱ्याला मिळणार ‘इतक्या’ डॉलर्सचं बक्षीस
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Talbid police have arrested the fugitive gangsters from Ahmedabad and left for Ahmedabad.
अहमदाबादमधून फरारी सराईत पाच गुंडांना कराडजवळ अटक, तळबीड पोलिसांची कारवाई
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Police beaten in Nigdi Three arrested
पुणे : निगडीत पोलिसांना मारहाण; तिघे अटकेत
Meter inspector suspended in bribery case
पिंपरी : लाच प्रकरणातील मीटर निरीक्षक निलंबित
Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
Story img Loader