लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : ऑनलाईन फसवणुकीसाठी सिम कार्ड पुरवणाऱ्या २५ वर्षीय तरूणाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. आरोपी अजय बिर्‍हाडे हा मूळचा जळगाव येथील अमळनेरचा रहिवाशी आहे. आरोपीने राजस्थान येथील अलवार परिसरातील सायबर फसवणूक करणाऱ्यांना सुमारे ५०० सिम कार्ड विकली असून त्याद्वारे मुख्य आरोपी देशभरातील सामान्य नागरिकांची सायबर फसवणूक करीत आहेत.

मुसा मोहीयोउद्दीन शेख (७२) वांद्रे येथे राहत असून ते एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांना २७ डिसेंबरला मधुकर गावित या बनावट नावाने फेसबुकवर खाते तयार करून संदेश पाठविण्यात आला होता. त्यात आपला मित्र केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असून त्याच्या घरातील विविध वस्तूची स्वस्तात विक्री करायची आहे, असे नमुद केले होते. आरोपींने आमिष दाखवून शेख यांना २७ डिसेंबर २०२३ ते १ मार्च २०२४ या कालावधीत १ लाख ७६ हजार ५०० रुपये विविध बँक खात्यात हस्तांतरित करण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर कोणत्याही वस्तू न पाठवता शेख यांची फसवणूक केली. याप्रकरणी शेख यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार केल्यानंतर सायबर कक्षाच्या पोलिसांनी तपास सुरू केला.

आणखी वाचा- मुंबई : बेस्ट बसची आजपासून अटल सेतूवरून धाव

तपासादरम्यान पोलिसांना अज्ञात सायबर आरोपीने बनावट कागदपत्राद्वारे सिम कार्ड खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यात सिम कार्ड विक्रेता आरोपी अजय बिर्‍हाडे याचा सहभाग असल्याचे पोलिसांना समजले. मिळालेल्या माहितीच्या आधारे या पथकाने जळगावच्या अमळनेर, आंबेडकर भवन, फरशी रोड येथील रहिवाशी असलेल्या अजयला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सायबर फसवणूक करणाऱ्यांना सिम कार्ड विकल्याचे सांगितले. त्याने आतापर्यंत सुमारे ५०० सिम कार्डची राजस्थानच्या अलवार शहरात विक्री केली होती. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.