मुंबईः विविध औषध कंपन्यांच्या नावाने परदेशी नागरिकांना दूरध्वनी करून प्रतिबंधात्मक औषधे विकणाऱ्या अवैध कॉल सेंटरवर गुन्हे शाखेने कारवाई केली असून याप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात तपासणीत आरोपींनी मुंब्रा येथील नागरिकाच्या मदतीने व्हायग्रा, सियालिस, लिविट्रो व ट्रेमोडोल या सारखी औषधांची विना परवानगी विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. छाप्यानंतर आरोपींंनी सर्वर बंद करून पुरावे नष्ट केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> दक्षिण मुंबईत बुधवार, गुरुवारी पाणी पुरवठा बंद; जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
cyber fraudsters, Eight people arrested ,
सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अंधेरी पूर्व येथील द समिट बिझनेस बेमधील(ओमकार) तिसऱ्या मजल्यावरील ग्लोबल सर्विसेस येथे अवैध कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष १० च्या पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शनिवारी गुन्हे शाखेने या ठिकाणी छापा टाकला असता साकीब मुस्ताक सय्यद(३८), यश शर्मा(२६) व एका साथीदाराच्या मदतीने अवैध कॉल सेंटर चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यासाठी आठ मुले कॉल सेंटरवर काम करत होते. ते व्हिओआयपी यंत्रणेद्वारे अमेरिकेतील नागरिकांना विविध औषध कंपन्यांच्या नावाने दूरध्वनी करून व्हायग्रा, सियालिस, लिविट्रो व ट्रेमोडोल या सारख्या प्रतिबंधात्मक औषधांची सलमान मोटरवाला या मुंब्रा येथे राहणाऱ्या व्यक्तीमार्फत विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्या मार्फत आरोपींनी केंद्र व राज्य सरकारचा महसुल बुडवला आहे. या छाप्यानंतर याप्रकरणातील संशयीत इरफान कुरेशी, सलमान मोटरवाला व राशीद अन्सारी यांनी सर्वर बंद करून तेथील यंत्रणेतील फाईलही डिलिट करून पुरावे नष्ट केले. याप्रकरणी गुन्हे शाखेने तीन मोबाईल संच, एक लॅपटॉप, एक सर्वर, २४ हार्ड डिस्क, एक राऊटर असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी फसवणूक, तोतयागिरी व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासणीत आरोपींकडे कॉल सेंटर चालवण्याचा कोणताही परवाना साडलेला नाही. आरोपींनी अमेरिकतील अनेक नागरिकांना प्रतिबंधात्मक औषधांची विक्री केली असून त्याबाबत आता गुन्हे शाखा तपास करत आहे. याप्रकरणी साकीब सय्यद(३८), यश शर्मा(२६) यांच्यासह कॉलसेंटरमध्ये काम करणारे उजेर शेख(२६), जुनैद शेख(२२), गौतम महाडीक(२३), जीवन गौडा(२१), मुनीद शेख(४०), हुसैन शेख(२३), विजय कोरी(३८), मोहम्मद सुफीयान मुकादम(२०) यांना अटक केली आहे. यातील शर्मा हा व्यवसायाने वकील असून तेथे विधी सल्लागार म्हणून काम करत होता.