लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: एप्रिल महिन्यात मुंबईत १० हजार ५१४ घरांची विक्री झाली आहे. त्यातून मुद्रांक शुल्कापोटी ८९९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. एकूण घरविक्रीत ८३ टक्के निवासी आणि १७ टक्के अनिवासी मालमत्तेचा समावेश आहे.

नवीन वर्षात, २०२३ मध्येही मुंबईतील घरविक्रीत वाढ होताना दिसत नाही. जानेवारी ते एप्रिलदरम्यान सरासरी ९ ते १३ हजाराच्या दरम्यान घरविक्री झाली आहे. जानेवारीत ९ हजार घरे विकली गेली असून त्यातून ६९२ कोटी रुपये महसूल मिळाला, तर फेब्रुवारीत ९ हजार ६८४ घरविक्री झाली असून त्यातून ११११ कोटी रुपये महसूल मिळाला. मार्चमध्ये मात्र घरविक्रीने १३ हजाराचा टप्पा पार केला मार्चमध्ये १३ हजार १५१ घरांची विक्री झाली असून १२२५ कोटी रुपये महसुल मिळाला आहे.

आणखी वाचा-दोन महिन्यांत पाणी गळतीच्या २९२१ तक्रारी; अंधेरी, जोगेश्वरीत सर्वाधिक त्रास

मार्चमध्ये घरविक्रीत काहीशी वाढ झाली असतानाच एप्रिलमध्ये मात्र घरविक्री पुन्हा काहीशी घटली आहे. एप्रिलमध्ये १० हजार ५१४ घरांची विक्री झाली तर ८९९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षी, २०२२ मध्येही साधारण ११ हजार घरांची विक्री झाली होती. एप्रिल २०२२ मध्ये ११ हजार ७४३ हजार घरांची विक्री झाली होती त्यातून ७३७ कोटी रुपये इतका महसूल मिळाला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sale of ten and a half thousand houses in mumbai in april mumbai print news mrj
Show comments