सुमारे १० वर्षांपूर्वी मद्यधुंदावस्थेत गाडी चालवताना पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याचा आरोप असलेला अभिनेता सलमान खान याला पोलीस पाठिशी घालत असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने वांद्रे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह सलमानला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. तसेच २७ डिसेंबर रोजी न्यायालयात ‘न चुकता’ हजर राहण्याचेही फर्मान सोडले आहे.
मद्यधुंदावस्थेत गाडी चालवून वांद्रे येथील अमेरिकन बेकरीसमोरील पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याचा आरोप सलमानवर आहे. या घटनेला १० वर्षे उलटली, तर त्याच्यावरील खटला अद्याप निकाली निघालेला नाही. सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असूनही अटकेनंतर लगेचच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. सलमानला पाठिशी घालण्यासाठीच पोलीस हेतूत: खटल्याची सुनावणी लटकवत असल्याची तक्रार संतोष दौंडकर या सामाजिक कार्यकर्त्यांने वांद्रे महानगरदंडाधिकारी न्यायालयात केली आहे. घटनेशी संबंधित साक्षीदारांना हेतूत: उशिरा साक्षीसाठी बोलावण्यात येते व खटल्याच्या सुनावणीला विलंब केला जातो, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी हेतूत: खोटे वैद्यकीय पुरावेही सादर केल्याचा आरोप दौंडकर यांनी केला आहे. सलमानलाही न्यायालयात हजर राहण्यासाठी १०० वेळा समन्स बजावण्यात आले. मात्र आतापर्यंत तो ९० वेळा गैरहजर राहिल्याचेही दौंडकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांच्या वरदहस्तामुळेच सलमान स्वत:ला वाचवत असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी दौेंडकर यांच्यावतीने अॅड. आभा सिंग यांनी न्यायालयाकडे केली आहे.
‘हिट अॅण्ड रन’ प्रकरण: सलमानला न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस
सुमारे १० वर्षांपूर्वी मद्यधुंदावस्थेत गाडी चालवताना पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याचा आरोप असलेला अभिनेता सलमान खान याला पोलीस पाठिशी घालत असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने वांद्रे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह सलमानला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
First published on: 04-12-2012 at 04:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman hit and run case court issue notice to salman khan