मुंबई : अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळील गोळीबाराप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी दोन आरोपींना पंजाब येथून अटक केली असून मुंबई पोलिसांचे पथक गुरूवारी रात्री आरोपींना घेऊन मुंबईत दाखल झाले. या दोन्ही आरोपींवर शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. अटक आरोपींपैकी एक बिष्णोई टोळीशी संबंधित असून त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन पिस्तुल व जिवंत काडतुसे पुरवल्याप्रकरणी सोनू सुभाष चंदर (३७) व अनुज थापन (३२) यांना दक्षिण पंजाबमधून अटक करण्यात आली होती. चंदर याची शेती व किराणा दुकान आहे. तसेच थापन हा ट्रकवर मदतनीस म्हणून कामाला आहे. बिष्णोई टोळीकडून दोन्ही आरोपींना दोन पिस्तुल व ४० काडतुसे पुरवण्यात आली होती. ती पिस्तुले देण्यासाठी चंदर व थापन १५ मार्च रोजी पनवेलला आले होते. ते पनवेलमध्ये तीन तास थांबले होते. गुप्ता व पाल यांना पिस्तुल देण्यापूर्वी चंदर व थापन यांनी दोन गोळ्या झाडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईनंतर पोलीस पथक आरोपींना घेऊन गुरूवारी रात्री उशीरा मुंबईत दाखल झाले. दोन्ही आरोपींना शुक्रवारी मुख्य दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हेही वाचा : ‘मविआ’च्या समर्थनार्थ आंबेडकरवादी कार्यकर्ते सक्रिय; राज्यघटना बदलली जाण्याच्या धोक्याची चर्चा

सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना गुन्हे शाखेने यापूर्वी अटक केली होती. त्यामुळे याप्रकरणात अटक आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे. चंदर व थापन यांनी पुरवलेल्या पिस्तुलाने पालने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. त्यावेळी गुप्ता मोटारसायकल चालवत होता. पाल हा अनमोल बिष्णोईच्या थेट संपर्कात होता. गोळीबार केल्यानंतर त्यांनी दुचाकी माऊंट मेरी परिसरात सोडली. त्यानंतर त्यांनी मोबाइल फोनही नष्ट केले व ते नवे मोबाइल क्रमांक वापरू लागले.