‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱया बॉलीवूडकरांमध्ये प्रसिद्ध अभिनेता सलमान खान देखील सामील झाला आहे. गजेंद्र चौहान यांनी विद्यार्थ्यांची काळजी ओळखून राजीनामा दिला पाहिजे. चौहान यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकावे कारण, या इंडस्ट्रीला विद्यार्थ्यांनी घडविले आहे, असे सलमान माध्यमांशी बोलताना म्हणाला. यापू्र्वी ऋषि कपूर, रणबीर कपूर, अनुपम खैर, राजकुमार राव, पियुष मिश्रा या बॉलीवूडकरांनी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
संप मागे घ्या नाहीतर कारवाई करू – एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना नोटीस
गेल्या महिनाभरापासून एफटीआयआयचे विद्यार्थी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्ती विरोधात आंदोलन करत आहेत. कलेच्या क्षेत्रात वैभवशाली परंपरा लाभलेल्या या संस्थेच्या अध्यक्षपदी पात्र व्यक्तीचीच निवड व्हावी, अशी इच्छा विद्यार्थ्यांची आहे. एफटीआयआयच्या अध्यक्षपदासाठी सहा महिन्यांपूर्वी संभाव्य उमेदवारांची जी यादी तयार करण्यात आली होती. त्यामध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि श्याम बेनेगल अशा दिग्गजांची नावे संस्थेच्या अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आली होती. मात्र, सरकारने या सगळ्यांना डावलून गजेंद्र चौहान यांच्याकडे एफटीआयआयचा कारभार सोपविण्याचा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे.
‘एफटीआयआय’च्या आंदोलक विद्यार्थ्यांना सलमान खानचा पाठिंबा
'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया'च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱया बॉलीवूडकरांमध्ये प्रसिद्ध अभिनेता सलमान खान देखील सामील झाला आहे.
First published on: 16-07-2015 at 05:57 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan supports striking ftii students