केवळ छायाचित्र काढत असल्यामुळे अभिनेता सलमान खानने त्याच्या एका चाहत्याचा मोबाईल आपल्या हातात घेऊन जोरात फेकून दिला. संबंधित चाहत्याने ही माहिती दिली. लाडक्या अभिनेत्याकडूनच हा ‘प्रसाद’ मिळाल्यामुळे चाहता नाराज झाला असून, सलमान खानकडून आपल्याला ही अपेक्षा नव्हती, असे मत त्याने मांडले आहे.
सलमान खान सोमवारी मुंबईत गाडीतून येत असताना हमीद रजा नावाच्या एका तरुण चाहत्याने स्वतःकडील मोबाईलमध्ये त्याचे छायाचित्र काढण्यास सुरुवात केली. आपले छायाचित्र काढले जात असल्याचे कळल्यावर सलमान खानने हमीद रजाला स्वतःजवळ बोलावून घेतले आणि त्याचा मोबाईल मागितला. हमीदने लगेचच आपला मोबाईल सलमान खानकडे दिला. यानंतर चिडलेल्या सलमानने रागाच्या भरात तो फोन जोरात फेकून दिला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे हमीद रजा गोंधळून गेला. त्यानंतर त्याने पत्रकारांशी बोलताना घडल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या घटनेबाबत सलमान खानकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

Story img Loader