पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी कोल्हापूरचे समरजितसिंह घाटगे यांची नियुक्त करण्यात आली आहे. यापूर्वीचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. घाटगे हे कागलच्या शाहू महाराजांच्या घराण्याचे वंशज आहेत.
घाटगे यांनी गतवर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. घाटगे यांनी भाजपमध्ये यावे म्हणून कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे प्रयत्न केले होते. प्रवेश करतेवेळीच त्यांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देण्याचा शब्द देण्यात आला होता, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. भाजपने त्यांना अध्यक्षपद देऊन आपला शब्द पूर्ण केला आहे. पुणे म्हाडाच्या अध्यक्षला राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे.
घाटगे हे शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. घाटगे हे शाहू महाराजांच्या कागलच्या घराण्याचे वंशज आहेत. ते भाजपमध्ये आल्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघात भाजपला मजबुती मिळणार आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे नेते अंकुश काकडे हे पुणे म्हाडाचे अध्यक्ष होते. शासनाच्या वतीने आज अधिसूचना काढून काकडेंची नियुक्ती रद्द करून घाटगे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा