शिवप्रतिष्ठान संस्थेचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या कार्यक्रमादरम्यान दलित पँथर आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. हा प्रकार मुंबईतील शिवडी येथे घडला. या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा प्रकार सांयकाळी आठच्या सुमारास घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज (रविवार) सांयकाळी संभाजी भिडे यांचा नियोजित कार्यक्रम होता. दलित पँथर आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरुवातीला काही कार्यकर्त्यांनी भिडेंविरोधात घोषणाबाजी केली. त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा असाच प्रकार घडला. त्यावेळी काही महिला कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या. या संघटनांचा भिडे यांच्या कार्यक्रमाला विरोध होता. कार्यक्रमानंतर संभाजी भिडे हे तेथून निघून गेले.