मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे समीर ॲप तांत्रिक अडचणींमुळे ३१ डिसेंबर रोजी दुपारपासून बंद होते. त्यामुळे मागील तीन दिवस नागरिकांना मुंबईच्या हवेचा निर्देशांक समजू शकला नाही. दरम्यान, गुरुवारी सायंकाळपासून समीर ॲप पूर्ववत झाले आणि मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक उपलब्ध झाला.

हेही वाचा >>> परदेशी मालमत्ता व काळ्या पैशांच्या प्रकरणात ईडीकडून आठ कोटींच्या मालमत्तेवर टाच, पुण्यातील जमिनीचा सहभाग

Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
Will water supply in Wardha remain shut indefinitely
वर्ध्यात पाण्यासाठी हाहा:कार! पाणीपुरवठा बेमुदत बंद राहणार ?
Pune Municipal Corporation takes action after stray dog ​​attack
भटक्या श्वानांच्या हल्ल्यानंतर महापालिकेने उचलले हे पाऊल!
Mora port, Signature campaign, Mora port news,
मोरा बंदरातील गाळ काढण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम

मागील अनेक दिवसांपासून मुंबईची हवा खालावलेली आहे. त्यामुळे मुंबईचा दैनंदिन हवा गुणवत्ता निर्देशांक जाणून घेण्यासाठी सध्या मुंबईकर समीर ॲपचा प्रामुख्याने वापर करतात. मात्र, समीर ॲप तांत्रिक अडचणींमुळे ३१ डिसेंबर रोजी दुपारपासून बंद होते. त्यामुळे मागील तीन दिवस नागरिकांना मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक जाणून घेता आला नाही. समीर ॲप बंद पडले त्यादिवशी दुपारनंतर सर्व भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक दिसेनासा झाला. तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरही हवा गुणवत्ता निर्देशांकांची नोंद दिसत नव्हती. यामुळे मागील तीन दिवस मुंबईचा हवा निर्देशांक जाणून घेता आला नसल्याची खंत मुंबईकारांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> प्राण्यांसाठी निमसुलाइड औषध वापरण्यावर देशात बंदी; केंद्र सरकारचा गिधाडांच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समीर ॲपवर देशभरातील १०० हून अधिक शहरांतील दैनंदिन हवेच्या गुणवत्तेची माहिती उपलब्ध होते. या ॲपवर नागरिकांना हवा प्रदूषणाबाबतच्या तक्रार करता येते. प्रदूषण मापनासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची १४ केंद्रे, भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था, पुणे यांची ९ केंद्रे तर पालिकेची ५ केंद्रे मुंबईत स्थापित करण्यात आली आहेत. या सर्व केंद्रावरील हवा निर्देशांक समीर ॲपवर दरदिवशी मिळतो. मुंबईच्या बिघडलेल्या हवेमुळे गेले अनेक दिवस नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसांत सातत्याने नागिराकांना वाईट हवेचा सामना करावा लागला आहे. अनेकांना हवा प्रदूषणामुळे श्वसनविकारांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी समीर ॲप बंद असल्याने हवा गुणवत्ता निर्देशांक समजू शकला नाही.

Story img Loader