बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या समीर भुजबळ यांना ८ फेब्रुवारीपर्यंत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समीर भुजबळ यांना मंगळवारी विशेष न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने हा निकाल दिला. तत्पूर्वी  समीर भुजबळ यांना वैद्यकीय तपासणीसाठी सेंट जॉर्ज रूग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान, यावेळी समीर भुजबळ यांनी भुजबळ कुटुंबियांविरुद्ध कारवाई करण्यासाठी किरीट सोमय्या ‘ईडी’वर दबाव आणत असल्याचा आरोप केला. मी आजपर्यंतच्या तपासात ईडीला संपूर्ण सहकार्य केले आहे. मात्र, काही जणांकडून भुजबळ कुटुंबियांना दोषी ठरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही या सगळ्यातून सहीसलमात सुटू, असा विश्वासही समीर भुजबळांनी व्यक्त केला. ‘ईडी’ने समीर भुजबळ यांना काल रात्री अटक केली होती.

Story img Loader