‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या माध्यामतून समीर मोडक यांना दुबई सहल

मुंबई : ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये ग्राहकांनी रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह, दुबई सहल अशा भरघोस बक्षिसांचा आनंद लुटला. हा पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी माटुंगा येथील ‘गुजराथी क्लब’मधील ‘रंगोली’ येथे दिमाखात पार पडला. खरेदीसह बक्षिसे मिळाल्याने उपस्थितांचा आनंद द्विगुणीत झाला. कुणाल रेगे यांच्या निवेदनाने कार्यक्रमाला रंगत आणली.

१६ ते २७ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या महोत्सवात समीर मोडक यांना दुबई सहलीचे बक्षीस मिळाले. हे बक्षीस त्यांचे वडील राजाराम मोडक यांनी स्वीकारले. ‘कधी स्वप्नातही वाटले नव्हते की दुबई सहलीची भेट मिळेल. ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ने खरोखरच वाचकांना सुवर्णसंधी दिली आहे,’ असे ते म्हणाले.

‘लोकसत्ता’ने अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम करत राहावे व बक्षिसे जिंकण्याची संधी वाचकांना द्यावी, असे मत विजेत्यांसह उपस्थित नातेवाईकांनी व्यक्त केले. गोमंतक हॉटेलमध्ये सहज जेवायला गेले आणि मायक्रोवेव्हचे बक्षीस मिळाले. ‘लोकसत्ता’च्या शॉपिंग फेस्टिव्हलमुळे हा आनंद मिळाला, अशी भावना वैदेही मोहिले यांनी व्यक्त केली.

स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे

* गिफ्ट व्हाऊचर – माधवी लिंग्रस (सायन), पूजा म्हात्रे (दहिसर), विक्रम शिंदे, शारदा नवले (विलेपार्ले), सुभाष कुलकर्णी (माहीम).

* मायक्रोवेव्ह – वैदेही मोहिले (मुलुंड), रंजना पेडणेकर (बोरिवली)

* एलईडी टीव्ही – शिवानी वैद्य (विलेपार्ले)

* वॉशिंग मशीन – भारती राऊ त (अंधेरी)

* रेफ्रिजरेटर – संतोष साबळे (वडाळा), अभिषेक केळकर (परळ)

* एअर कंडिशनर – प्रज्ञा वाणारसे (वरळी)

*  दुबई सहल – समीर मोडक (भांडुप)

प्रायोजक

‘रिजेन्सी’ समूह प्रस्तुत ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’साठी ‘वास्तुरविराज’ आणि ‘पितांबरी’ पॉवर्ड बाय पार्टनर आहेत. ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ हे या महोत्सवाचे गोल्ड पार्टनर आहेत. ‘एम.व्ही. पेंडुरकर ज्वेलर्स’, ‘व्ही. एम. मुसळुणकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा.लि.’, ‘नम्रता ज्वेलर्स’, ‘मे. पांडुरंग हरी वैद्य अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स’, ‘उज्ज्वल तारा’ हे सिल्व्हर पार्टनर आहेत. याशिवाय ‘अपना बाजार’, ‘राणेज पैठणी’ आणि ‘अजय अरविंदभाई खत्री’ हे या महोत्सवाचे गिफ्ट पार्टनर आहेत. फूड अ‍ॅण्ड बेवरेजेज पार्टनर ‘अंग्रेजी ढाबा’, ट्रॅव्हल पार्टनर ‘केसरी टूर्स’, एंटरटेन्मेंट पार्टनर ‘एनडीज फिल्म वर्ल्ड’, हॉस्पिटॅलिटी पार्टनर ‘लँडमार्क मर्सिडीज’ आहेत.