राज्यात सध्या एनसीबीनं २ ऑक्टोबरला क्रूजवर टाकलेला छापा, त्यातून अटक करण्यात आलेला शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि या सर्व प्रकरणावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप या मुद्द्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याआधी देखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीका केली आहे. आज देखील नवाब मलिक यांनी आपला जावई समीर खान याला एनसीबीनं अडकवल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी न्यायालयाचा अहवाल आणि त्यापाठोपाठ समीर वानखेडे यांचा नंबर देखील जाहीर केला आहे. यानंतर आता समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी या प्रकरणावर त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.

नवाब मलिक यांचे गंभीर आरोप

नवाब मलिक यांनी आज सकाळी ११ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून समीर वानखेडे आणि एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. “कोर्ट ऑर्डरमध्ये म्हटलंय की २०० किलो गांजा मिळालेला नाही. फक्त शाहिस्ता फर्निचरवालाकडे ७.५ ग्राम गांजा मिळाला. बाकी सगळं हर्बल टोबॅको आहे असं रिपोर्टमध्ये आलं आहे. प्रश्न हा उपस्थित होतो की एवढ्या मोठ्या एनसीबीसारख्या एजन्सीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्यकारक आहे. या एजन्सींकडे इन्स्टंट टेस्टिंगचं किट असतं. ज्यातून अंमली पदार्थ आहे किंवा नाही हे लगेच समजतं. याचा अर्थ त्यांनी या सर्व गोष्टी तपासल्या, गांजा नव्हता. पण तरी लोकांना अडकवण्यात आलं. २७ अ चं कलम लागूच होत नाही. शाहिस्ता फर्निचरवालावर खटला दाखल होतो. पण तिला त्याच दिवशी जामीन देण्यात आला. रिया चक्रवर्ती प्रकरणात देखील करण सजनानीला गुंतवलं. राहिला फर्निचरवाला या आरोपीला देखील गुंतवलं. रिया चक्रवर्ती प्रकरणातल्या एका आरोपीला या प्रकरणात टाकलं”, असा दावा नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”

नवाब मलिक यांनी एनसीबीवर केलेले आरोप – वाचा सविस्तर

दरम्यान, नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर दुपारी समीर वानखेडे यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. यासंदर्भात माध्यमांनी विचारणा केली असता समीर वानखेडे म्हणाले, “”हे प्रकरण सध्या वरच्या कोर्टात आहे. अशा प्रकरणामध्ये आपण त्यावर काही बोलू शकत नाही”. दरम्यान, २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचा उल्लेख कोर्टाच्या अहवालात असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत. त्यावर बोलताना समीर वानखेडे यांनी फक्त, “तुम्ही रिपोर्ट व्यवस्थित वाचा”, इतकंच म्हटलं आहे. त्यामुळे नेमकं अहवालात काय लिहिलंय, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. नवाब मलिक यांनी वानखेडेंचा नंबर पत्रकार परिषदेत जाहीर केल्याबद्दल ते म्हणाले, “माझा नंबर जाहीर केला, हरकत नाही, ती त्यांची इच्छा आहे”.

“माझा जावई समीर खानला २०० किलो ड्रग्ज सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो ड्रग्जचं रॅकेट चालवतो असं सांगण्यात आलं होतं. एनसीबीच्या कारवाईचे फोटो आणि प्रेस रिलीज समीर वानखेडे यांच्या नंबरवरूनच पाठवण्यात आले होते. मात्र, न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचं उघड झालं आहे”, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. यावेळी नवाब मलिक यांनी एसीबीच्या अधिकाऱ्याच्या नंबरवरून व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आलेली प्रेस रिलीज आणि कारवाईचे फोटो देखील दाखवले. तसेच, समीर वानखेडेंचा फोन नंबर देखील त्यांनी यावेळी दाखवला.

Story img Loader