गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने चर्चेत असणारं आर्यन खान प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. मुंबई क्रूज प्रकरणाची चौकशी करणारे तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत. समीर वानखेडे यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याल आला आहे. आता समीर वानखेडेंनी या प्रकरणासंदर्भात तेव्हा त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्याची केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. ‘फ्री प्रेस जर्नल’नं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून या चॅटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वृत्तामध्ये देण्यात आलेले व्हॉट्सअॅप चॅट्स हे समीर वानखेडे आणि तत्कालीन एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्याबरोबर झाल्याचं दिसत आहे. यामध्ये कॉर्डेलिया क्रूजवर समीर वानखेडेंच्या टीमनं छापा टाकल्यानंतरच्या घडामोडींदरम्यानचं या दोघांमधलं संभाषण दिसत आहे. यानुसार, आर्यन खानला या क्रूज पार्टीसाठी तब्बल २७ लाखांची व्हीव्हीआयपी तिकीटं देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या क्रूज पार्टीचं प्रमोशन करण्यासाठी आर्यन खान आणि त्याच्या आठ मित्रांसाठी ही तिकिटं देण्यात आल्याचा दावा या चॅटच्या हवाल्याने वृत्तात करण्यात आला आहे.

ड्रग्ज पार्टीची मोडस ऑपरेंडी? समीर वानखेडेंच्या चॅटमध्ये काय?

“या सगळ्यामध्ये बॉलिवूड महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण ड्रग्जचं व्यसन पसरवण्यासाठी आणि अधिकाधिक ग्राहक जमवण्यासाठी, ड्रग्जची विक्री करण्यासाठी बॉलिवूडमधील लोकांचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून किंवा मध्यस्थ म्हणून वापर केला जातो. त्यामुळेच आर्यन खानला मोफत तिकिटं, मुली आणि ड्रग्ज मिळालं. कुणीही तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या नावाचा रेव्ह पार्टीची तिकिटं विकण्यासाठी वापर करू शकत नाही”, असं या चॅटमध्ये समीर वानखेडे ज्ञानेश्वर सिंह यांना सांगत असल्याचं दिसत आहे.

“वानखेडेंनी सुशांतसिंह प्रकरणात आरोपी बनण्यास सांगितलं”, ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा गौप्यस्फोट

दरम्यान, बॉलिवुडमधील सेलिब्रिटी मंडळींचा कशा प्रकारे वापर केला जातो, यासंदर्भात या चॅटमध्ये दावे करण्यात आले आहेत. “अनेक बॉलिवुड स्टार्स या व्यवहाराचा हिस्सा आहेत. ते शहराच्या बाहेर किंवा रिसॉर्ट्समध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन करतात. तिथे फुकट ड्रग्ज पुरवतात. त्यात बॉलिवुड स्टार्सला आमंत्रित करतात. म्हणजे या पार्टीचं आणखीन प्रमोशन होतं. त्यानंतर एकदा का ड्रग्जचं व्यसन लागलं, की यांचे ग्राहक उत्तरोत्तर वाढतच जातात. सेक्स हा घटक असं व्यसन लावण्यात महत्त्वाचा ठरतो. त्याामुळे ते या पार्ट्यांमध्ये एमडीएमए आणि काही मुलींनाही बोलवतात”, असंही या चॅटमधून समोर आल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede whatsapp chat with ncp director on aryan khan arrest cruise party pmw