मुंबई: आर्यन खान अमलीपदार्थ प्रकरणानंतर चर्चेत आलेले मुंबई एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून दिलासा मिळाला आहे. याबाबत शुक्रवारी देण्यात आलेल्या आदेशात समीर वानखेडे व त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्रिसदस्यीय समितीने १२ ऑगस्ट २०२२ ला याप्रकरणी अंतिम आदेश जारी केला असून त्या आदेशात वानखेडे हे जन्माने मुस्लीम नाहीत. समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून विधीवत पद्धतीनुसार इस्लाम धर्म स्वीकारल्याचे सिद्ध होत नाही. वानखेडे आणि त्यांचे पालक हे हिंदू धर्मातील अनुसूचित जातीचे असल्याचे आढळून आले आहे, असे नमूद केले आहे. माजी मंत्री नवाब मलिक तसेच मनोज संसारे, अशोक कांबळे, संजय कांबळे या तक्रारदारांनी वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप नोंदवला होता.
समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र समितीकडून दिलासा
आर्यन खान अमलीपदार्थ प्रकरणानंतर चर्चेत आलेले मुंबई एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून दिलासा मिळाला आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 14-08-2022 at 00:51 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samir wankhede relief caste certification committee narcotics affair ysh