मुंबई : पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे देशातील सर्वात मोठे बंदर उभारण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावरून वाढवण बंदरावर पोहचता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

इगतपुरी – चारोटी असा ९० किमीचा महामार्ग एमएसआरडीसी बांधणार आहे. तर चारोटी ते वाढवण बंदर अशा अंदाजे ३५ किमीच्या महामार्गाचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) करणार आहे. त्यानुसार इगतपुरी ते चारोटी द्रुतगती महामार्गाचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या अंदाजे १२५ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गामुळे नागपूर – वाढवण बंदर थेट प्रवास अवघ्या काही तासांमध्ये करता येणार आहे.

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला

राज्यातील दोन मोठ्या जेएनपीटी आणि मुंबई बंदरांची कंटेनर हाताळण्याची क्षमता संपुष्टात येत आहे. त्यामुळे नवीन बंदर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सागरमाला उपक्रमाअंतर्गत जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे बंदर डहाणू तालुक्यातील वाढवण येथे उभारण्यात येणार आहे. या बंदराची उभारणी झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा आदी ठिकाणांहून मालवाहतूक वा इतर प्रकारची वाहतूक अतिवेगवान व्हावी, नागपूर – वाढवण बंदरदरम्यान थेट प्रवास करता यावा यासाठी एमएसआरडीसी कामाला लागले आहे. त्यातूनच समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाची संकल्पना पुढे आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या विस्तारीकरणानुसार इगतपुरी ते वाढवण बंदर, पालघरदरम्यान द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी याला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा >>> मुंबई : ७५ किलो गांजा व ४८०० कोडीनच्या बाटल्या जप्त, सहा जणांना अटक

अंदाजे १२५ किमीचा मार्ग

इगतपुरी – वाढवण बंदर द्रुतगती महामार्ग अंदाजे १२५ किमी लांबीचा असणार आहे. नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी आंतरबदल येथून इगतपुरी ते मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील चारोटी नाका असा ९० किमी लांबीचा महामार्ग एमएसआरडीसी बांधणार आहे. यासाठी अंदाजे नऊ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या ९० किमी लांबीच्या महामार्गाचा प्रस्ताव एमएसआरडीसी तयार करीत आहे. तर इगतपुरी – चारोटी महामार्गाचा प्रस्ताव येत्या काही दिवसांतच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

चारोटी येथे समृद्धी महामार्ग येऊन पोहचल्यानंतर वाढवण बंदरापर्यंत द्रुतगती महामार्ग नेण्याची जबाबदारी एनएचआयची आहे, अशी माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली. चारोटी – वाढवण बंदर द्रुतगती महामार्ग अंदाजे ३५ किमी लांबीचा असणार आहे. वाढवण बंदर हा केंद्र आणि राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे वाढवण बंदराला राज्यातील शक्य तितक्या जिल्ह्यांशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यातूनच या विस्तारीकरणाचा विचार पुढे आला आहे.