‘समझौता एक्स्प्रेस’ स्फोटातील मुख्य संशयित धनसिंग याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी २००८ सालच्या मालेगाव स्फोटाप्रकरणी अटक केली असून विशेष न्यायालयाने २८ डिसेंबपर्यंत कोठडी सुनावली.
‘समझौता एक्स्प्रेस’ स्फोटाप्रकरणी नुकत्याच अटक करण्यात आलेला आरोपी राजेंद्र चौधरी याने त्याच्या कबुलीजबाबात तो, धनसिंग, रामचंद्र कालसंगरा आणि संदीप डांगे अशा चौघांचा मालेगाव स्फोटातही सहभाग होता, अशी कबुली दिली आहे. यातील कालसंगरा आणि डांगे फरारी आहेत. सिंग हा कालसंगरा आणि डांगे यांचा खास सहकारी असून मालेगाव स्फोटासह अन्य घातपाती कारवायांमध्येही त्यांचा समावेश असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मालेगाव स्फोटातील अन्य आरोपी आणि कटाबाबत जाणून घेण्यासाठी सिंग याची चौकशी करायची असून त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील रोहिणी सालियान यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयानेही त्यांची विनंती मान्य करून सिंग याला २८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, ‘एनआयए’तर्फे आपल्याला मारहाण केली जात असल्याचा तसेच आपल्या कुटुंबियांनाही त्रास दिला जात असल्याची तक्रार सिंग याने न्यायालयाकडे केली.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा