पनवेल तालुक्यातील आजिवली गावातील एका गोदामावर छापा मारून नवीन पनवेल पोलिसांनी  तीन कोटी रुपयांचा रक्तचंदनाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी अलतमश अब्दुल मजीद शेख (२७) याला अटक करण्यात आली असून गोदाम मालक भरत भोईर यांची चौकशी सुरू आहे. या गोदामामध्ये मक्याच्या गोणीखाली ८५ रक्तचंदनाचे ओंडके लपवून ठेवल्याचे आढळून आले. हा माल केरळ येथून आला असल्याची माहिती पुढे आली आहे.

Story img Loader