झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दादर पोलिसांकडून त्यांची चौकशीही करण्यात आली. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज प्रकार परिषद घेत चिमदास विठ्ठलदास पत्राचाळ येथेही आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत या घोटाळ्यातील आरोपी आणि किशोरी पेडणेकर यांचे काय संबंध आहेत, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा – Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आता चार आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?

काय म्हणाले संदीप देशपांडे?

यादव नगर चिमदास विठ्ठलदास पत्राचाळ शंकर नगर नरमपथ मार्ग येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. “येथील १९५ क्रमांकाच्या भूखंडावर केवळ ६३ झोपड्या होत्या. त्यानंतर वसाहत अधिकारी आणि या योजनेचे मुख्य प्रवर्तक असलेले शिवसेनेचे पदाधिकारी बेलेकर यांच्यासह आणखी काही राजकीय नेत्यांनी मिळून या ६३ झोपड्यांच्या जागी २२१ झोपड्यांची नोंद केली. त्यानंतर वाढवण्यात आलेल्या झोपड्या विकून त्यातून पैसे गोळा करण्यात आले. यातील एक झोपडपट्टी एसआरए घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले वसाहत अधिकारी चंदू चव्हाण यांच्या नावावर आहे. तसेच त्यांनी खोटे प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. याचबरोबर ज्याचे दादरमध्ये मोठे हॉटेल आहे, त्यांच्या नावावरही येथे झोपडपट्टीची नोंद आहे, अशाप्रकारे इतर ठिकाणीही आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे”, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

हेही वाचा – ‘माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला’ म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठाकरे गटाकडून टीका, म्हणाले “अर्थात, म्हणजे…”

“हा सर्व प्रकार जेव्हा घडला त्यावेळी त्या भागाच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर होत्या. त्यामुळे ज्या वसाहत अधिकाऱ्याला अटक करण्यात आली, त्याच्या पाठिशी कोणाचा हात होता? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. आज तुम्ही म्हणात की तुम्ही महिला आहे. मग पैसे खाताना तुम्ही महिला आहे, हे तुम्हाला माहिती नव्हतं का? त्यामुळे किशोरी पेडणेकरांनी सहानुभूतीचे राजकारण करू नये”, असेही ते म्हणाले.