मुंबई : प्राजक्त देशमुख लिखित – दिग्दर्शित आणि भद्रकाली निर्मित ‘संगीत देवबाभळी’ या रंगभूमीवर इतिहास घडवणाऱ्या आगळ्यावेगळ्या नाटकाचे शेवटचे महोत्सवी प्रयोग सध्या सुरू आहेत. कार्तिकी एकादशीला नाटकाचा पाचशेवा प्रयोग झाल्यावर हे नाटक थांबणार आहे. तत्पूर्वी या नाटकाचे महोत्सवी प्रयोग निरनिराळ्या नाट्यगृहांतून सादर होणार आहेत.

त्यापैकी रविवार, १ ऑक्टोबरला डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात दुपारी ४.३० आणि रात्री ८.३० वाजता असे दोन प्रयोग सादर होणार आहेत. तर सोमवार, २ ऑक्टोबरला दादरच्या श्री शिवाजी मंदिरात सकाळी ११.३० वाजता, दुपारी ३.३० वाजता आणि रात्री ७.३० वाजता त्याचे प्रयोग होणार आहेत. रविवार, १५ ऑक्टोबर रोजी बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सकाळी ११.३० वाजता, दुपारी ४.३० वाजता आणि रात्री ८.३० वाजता असे ‘संगीत देवबाभळी’चे तीन प्रयोग होतील. त्याचप्रमाणे रविवार, ८ ऑक्टोबर रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये ‘संगीत देवबाभळी’चे तब्बल पाच विश्वविक्रमी महोत्सवी प्रयोग सादर होणार आहेत. सकाळी ७.३० वाजता, सकाळी ११.३० वाजता, दुपारी ३.४५ वाजता, सायंकाळी ७ वाजता आणि रात्री ९.३० वाजता असे हे पाच विक्रमी प्रयोग एकाच दिवशी सादर होणार आहेत.

Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Why Hindu gods dance
हिंदू देवता नृत्य करतात तर इतर धर्मातील देव नृत्य करत नाहीत असे का?। देवदत्त पट्टनायक यांच्याबरोबर कला आणि संस्कृती
The song Yellow Yellow from the movie Fasklass Dabhade is released
‘फसक्लास दाभाडे’मधील ‘यल्लो यल्लो’ गाणं प्रदर्शित
chinchwad music program of bela shende
भक्तिगीते, युगुलगीते, लावणी, चित्रपटगीतांनी रंगली सुरांची मैफिल
Marathi actress Shivani sonar will wear panaji nath in wedding
Video: शिवानी सोनार लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नात घालणार पणजीची नथ; म्हणाली, “जुने आणि पारंपरिक दागिने…”
Musician Tabla player Zakir Hussain Saaz Film
‘संगीतकार’ उस्तादांची अपरिचित कामगिरी…

हेही वाचा – “भाजपा आणि बावनकुळेंमध्ये आता दम नाही”, अंबादास दानवेंचे विधान, म्हणतात..

हेही वाचा – ‘तिजोरी’ भरण्यासाठी वाट्टेल ते? कोतवाल व्हायचे तर पाचशे रुपये शुल्क, अर्जही फुकट नाही

‘संगीत देवबाभळी’ला आजवर असंख्य नाट्यपुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले असून अनेक विद्याापीठांतील अभ्यासक्रमात त्याचा समावेश आहे.

Story img Loader