अनेक चाहत्यांचा आवडता ‘मुन्नाभाई’ अभिनेता संजय दत्त याच्या तुरुंगातून सुटकेचा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. येत्या गुरुवारी सकाळी संजय दत्तची येरवडा कारागृहातून सुटका करण्यात येणार आहे. त्या आनंदामुळे दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये ‘चिकन संजूबाबा’ ही डीश ग्राहकांना मोफत देण्यात येणार आहे. संजय दत्तच्या सुटकेच्या आनंदामुळे हॉटेलच्या मालकाने हा निर्णय घेतला आहे.
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात अवैधपणे शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेचा कालावधी कारागृहातील नियमांनुसार पूर्ण केल्यामुळे त्याची येत्या २५ फेब्रुवारीला, गुरुवारी सुटका करण्यात येणार आहे. तुरुंग प्रशासनानेच सोमवारी याबद्दल पत्रकारांना माहिती दिली. संजय दत्तच्या सुटकेचा आनंद व्यक्त करण्यासाठी दक्षिण मुंबईतील नूर मोहम्मदी हॉटेलमध्ये चिकन संजूबाबा ही डीश ग्राहकांना मोफत देण्यात येणार आहे. संजय दत्त यानेच या हॉटेलचे १९८६ मध्ये उदघाटन केले होते. त्याच्यावरील प्रेमामुळेच हॉटेलचे मालक खालिद हाकीम यांनी हा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले, या हॉटेलचे उदघाटन केल्यापासून संजय दत्त सातत्याने या हॉटेलमध्ये येतो. आमच्या हॉटेलमध्ये मिळणारे मांसाहारी आणि इतर पदार्थ संजय दत्तच्या विशेष आवडीचे आहेत. त्यातही आमच्याकडे मिळणारी नल्ली नारी डीश त्याच्या अधिक आवडीची आहे. व्हाईट चिकन बिर्याणीही त्याला जास्त आवडते. २०१० नंतर एका संजय दत्त आमच्या हॉटेलमध्ये आला होता आणि त्यावेळी त्याने ग्रेव्हीची चिकन डीश तयार केली होती. त्याच डिशला आम्ही चिकन संजूबाबा असे नाव दिले होते, असेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutts release to be celebrated by giving free chicken sanju baba at a restaurant