सरकारवर घणाघात होणार, या भीतीने पाय लटपटू लागले आहेत. महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तेरा अटी शर्ती घातल्या गेल्या. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अवमान महाराष्ट्रात होत आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा आहे. तुम्ही त्यांना अटी घालता, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीच्या मोर्चापूर्वी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मोर्चाला लावण्यात आलेल्या अटी-शर्तीवरून राऊतांनी शिंदे सरकारचा समाचार घेतला आहे. “हे नाही करायचं, इथे उभं राहायचं नाही, स्पीकर लावायचं नाही, भाषण लिहून द्या आता. पण, आता आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही. तसेच, यांचे महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली दबलं गेलं आहे,” अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे.

हेही वाचा : “हिंदुधर्मासाठी गेला मग राज्यपालांच्या वक्तव्यावर…”, रुपाली पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका; मनसेलाही लगावला टोला

“संयुक्त महाराष्ट्रातील लढ्याचे मोर्चे पाहिले आहेत. त्यांना महाविकास आघाडीचा मोर्चा पाहून तेव्हाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण, तेव्हाचे मोर्चे हे महाराष्ट्र प्रेमाणे भारवलेले होते. आताही समस्त महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा निघाला आहे,” असेही संजय राऊत यांनी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut attacks eknath shinde over mahavikad aghadi morcha in mumbai ssa