शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सुरू असलेल्या ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर मोठा गौप्यस्फोट केला आहे. “ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेत्यांवर आधी ईडीची कारवाई करून अटकेची भीती दाखवली, तशाचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही ईडी कारवाई होत आहे. तोच प्रयोग राष्ट्रवादीबरोबर सुरू आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला. ते गुरुवारी (१३ एप्रिल) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

संजय राऊत म्हणाले, “शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं हे शिवसैनिकाचं वर्णन असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढीत शौर्य होतं. यांना दाढी असेल तर ते शौर्य यांनी दाखवलं पाहिजे. मात्र, ते घाबरून गेले आणि इतरांनाही घाबरवलं.”

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”

“राष्ट्रवादीबरोबर एकनाथ शिंदेसारखाच प्रयोग सुरू आणि…”

“त्यावेळी निघून गेलेल्या आमदार आणि खासदारांपैकी निम्म्या लोकांवर ईडीच्या कारवाया सुरू होत्या. ते घाबरूनच गेले आहेत. आता तोच प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सुरू आहे हे सगळ्यांना माहिती आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला.

“एकनाथ शिंदे म्हणाले होती की, मला अटकेची भीती वाटते”

संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना अटकेची भीती वाटत असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, “आदित्य ठाकरेंनी जे सांगितलं ते सत्य आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर येऊन ‘मला तुरुंगात जायचं नाही, मला अटकेची भीती वाटते’ सांगितलं होतं. त्यांनी अशाप्रकारची चर्चा याच माझ्या मैत्री बंगल्यावर येऊन माझ्याशीही केली होती.”

हेही वाचा : VIDEO: उद्धव ठाकरे-संजय राऊतांबरोबर सव्वा तास काय चर्चा झाली? शरद पवार म्हणाले, “काही मुद्द्यांवर वेगळी मतं…”

“मी शिंदेंना सांगितलं की, माझ्यावरही असा प्रसंग येईल, पण…”

“तेव्हा आम्ही त्यांना वारंवार समजावत होतो की, आपण प्रसंगाला सामोरं जावं. आपण लढणारे लोक आहोत, आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारस आहोत. मी त्यांना सांगितलं की, माझ्यावरही असा प्रसंग येईल, मला अटक करतील अशी भीती आहे. मात्र, मी अटकेच्या तयारीत आहे,” असंही संजय राऊतांनी नमूद केलं.