मुंब्रा येथील शिवसेना शाखेवर बुलडोझर फिरवल्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे गटावर सडकून टीका केली. “हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. ज्यांनी पाप केलं त्यांचा हिशोब होईल,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
संजय राऊत म्हणाले, “हे पाप करणारे स्वतःला बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक समजतात. हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. शिवसेनेच्या आयत्या शाखा ताब्यात घेणे. त्यावर बुलडोझर फिरवून घटनाबाह्य मुखमंत्र्यांचा जय करणे ही विकृती आहे. मुंब्रा येथे शाखेवर बुलडोझर फिरवून ज्यांनी पाप केले. त्यांचा हिशोब होईल.”
हेही वाचा : “मनोज जरांगेंच्या जीवाचं काही बरंवाईट झालं, तर…”; मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले…
“हे कसले शिवसैनिक? हा तर कलंक”
“हे कसले शिवसैनिक? हा तर कलंक आहे. ११ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंब्रा शाखेला भेट देत आहेत. तुमच्या बुलडोझरपेक्षा स्वाभिमानी मनगटातील बळ महत्त्वाचे. हिशोब होईल. ११ नोव्हेंबरला मुंब्रा शाखा. जय महाराष्ट्र,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.