मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन गुप्तपणे मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या वाढत्या दिल्ली दौऱ्यांवर टोला लगावला. “दिल्लीने एकनाथ शिंदेंचं दारातील पायपुसणं केलं,” अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली. ते गुरुवारी (२६ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

“दिल्लीने एकनाथ शिंदेंचं दारातील पायपुसणं केलं”

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील नेते वारंवार दिल्लीत जात आहेत. यापर्वी असं होत नव्हतं. एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत असा दावा करतात. मी बाळासाहेब ठाकरेंचा स्वाभिमानी शिवसैनिक आहे, असाही ते दावा करतात. मात्र, दिल्लीने एकनाथ शिंदेंचं दारातील पायपुसणं केलं आहे. त्यांना वारंवार दिल्लीत जावं लागत आहे.”

Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
Dhananjay Deshmukh News
Dhananjay Deshmukh : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिलाय..”, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख काय म्हणाले?
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
Sanjay Raut News
Sanjay Raut : “मतदारांना XXX आणि लोकशाहीला…”, संजय राऊत यांची संजय गायकवाडांवर जोरदार टीका, एकनाथ शिंदेंना केलं ‘हे’ आवाहन
What Suresh Dhas Said ?
Suresh Dhas : “…यांनी बीडचा ‘बिहार’ नाही तर ‘हमास’, ‘तालिबान’ केला”, सुरेश धस यांची टीका
Devendra Fadnavis vs Sanjay Raut
Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांच्या रक्ताचे डाग धुवून, त्यांना..”; बीड प्रकरणावरुन संजय राऊत यांचा आरोप काय?

“पाणी, चहा पिऊ का, जेवण करू का, झोपू का हे विचारायला यांना दिल्लीला जावं लागतं”

“मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शिवाजी महाराज एकदाच दिल्ली, आग्र्याला गेले आणि सगळ्या खानांना, दिल्लीश्वरांना धडा शिकवून आले. एकनाथ शिंदेंना चहा घेऊ का, पाणी पिऊ का, जेवण करू का, झोपू का हे सर्व विचारायला दिल्लीत जावं लागतं. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे,” असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर शाब्दिक हल्ला चढवला.

हेही वाचा : “सुनील कावळेंच्या आत्महत्येला पूर्णपणे सरकार जबाबदार, आता…”; मनोज जरांगे आक्रमक

“एका भितीतून आणि निराशेतून मोदींचे महाराष्ट्र दौरे चालू”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान वारंवार महाराष्ट्रात, मुंबईत आणि शिर्डीत इकडे तिकडे फिरत आहेत. कारण त्यांनी महाराष्ट्रात जो जुगाड केलाय तो हरणार आहे हे दिसत आहे. त्यामुळे एका भितीतून, एका निराशेतून हे दौरे चालू आहेत. असं असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात येण्याविषयी कोणतीही बंधनं असू शकत नाहीत. मात्र, महाराष्ट्रातील भाजपा नेते मोदींना वारंवार राज्यात बोलावत आहेत कारण त्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.”

“महाराष्ट्रातील भाजपा नेते भ्रष्ट व अकार्यक्षम असल्यामुळे ते मोदींना बोलावत आहेत”

“या राज्यातील नेतृत्व भ्रष्ट आणि अकार्यक्षम असल्यामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना वारंवार महाराष्ट्रात बोलावत आहेत. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. ते मणिपूर आणि जम्मू काश्मीर सोडून देशात कुठेही जातात. उद्या ते इस्रायललाही जाऊ शकतात. मला त्यांच्याविषयी काही म्हणायचं नाही. ते पंतप्रधान आहेत, भाजपाचे सन्माननीय नेते आहेत. भाजपाची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि गंभीर असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना इथं वारंवार यावं लागत आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला.

Story img Loader