शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. “मोदी सरकारला मुंबईवर ताबा हवा आहे, त्यांना मुंबईच्या संपत्तीवर ताबा हवा आहे, त्यांना मुंबई गिळायची आहे, मुंबई विकायची आहे, मुंबई लुटायची आहे,” असा गंभीर आरोप राऊतांनी केला. ते बुधवारी (३० ऑगस्ट) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “सध्याच्या केंद्र सरकारला मुंबईवर ताबा हवा आहे. त्यांना मुंबईच्या संपत्तीवर ताबा हवा आहे, त्यांना मुंबई गिळायची आहे, मुंबई विकायची आहे, मुंबई लुटायची आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी राहू नये आणि राहिली तरी त्या मुंबईवर महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नियंत्रण राहू नये यासाठी मागील १० वर्षे मोदी-शाहांचं सरकार काम करत आहे.”

Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sanjay Raut on Mahavikas aghadi
Sanjay Raut : महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, “काँग्रेसच्या केंद्रीय समितीने…”
Bandra Bharatnagar sra action
Mumbai : “अदाणी समूहाला पैशांनी…”, मुंबईतल्या वांद्रे भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाडकामाविरोधात जोरदार राडा
Aaditya Thackeray On Mumbai University Senate Election 2024
Maharashtra Breaking News : ठाकरे गटाच्या देवेंद्र फडणवीसांशी भेटीगाठी वाढल्या? यामागे नेमकं काय? आदित्य ठाकरे म्हणाले…
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Maharashtra News: ‘धनंजय मुंडे जातीय तेढ निर्माण करत आहेत’ जरांगे पाटील
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Manoj Jarange Patil: “… तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
Maharashtra Mumbai News Live Updates in Marathi
“शरद पवार-अजित पवार एकत्र आले तर…”, प्रफुल पटेल यांचं मोठं विधान

“मोदी शाहांनी मुंबईतील मराठी माणसाला कंगाल करण्याचं कारस्थान रचलं”

“मोदी शाहांनी सुरुवातीला मुंबईला कमकुवत केलं. मुंबईतील अनेक व्यवसाय, उद्योग, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यालयं, गुजरातमध्ये खेचून नेली. मुंबईच्या आर्थिक नाड्या आवळल्या. त्यांनी मुंबईतील मराठी माणसाला कंगाल करण्याचं कारस्थान रचलं. आता शेवटी मुंबईचा विकास मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार करणार नाही. त्यासाठी निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

“अत्यंत बुळचट, लाचार आणि गुलामी पद्धतीचा मुख्यमंत्री सत्तेवर”

संजय राऊत पुढे म्हणाले, “मोदी-शाहांच्या, उद्योगपती धनिकांच्या सरकारनं मुंबईची सर्व सुत्रे ठरल्याप्रमाणे दिल्लीकडे घेतली आणि त्यांचा खरा चेहरा उघड झाला. हे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने होऊ दिलं नसतं. त्यामुळे शिवसेना फोडण्यात आली. एक अत्यंत बुळचट, लाचार आणि गुलामी पद्धतीचा मुख्यमंत्री सत्तेवर बसवला आणि त्यांना मुंबईबाबत हवं ते करून घेतलं.”

“सरकारमध्ये मराठी म्हणून अंशभर जरी स्वाभिमान शिल्लक असेल, तर…”

“या मुख्यमंत्र्यामध्ये आणि त्यांच्या सरकारमध्ये मराठी म्हणून अंशभर जरी स्वाभिमान शिल्लक असेल, तर ते राजीनामा देतील आणि सरकारला जाब विचारतील. १०५ हुताम्यांच्या बलिदानातून ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे. मुंबई महाराष्ट्रात राहावी, मुंबईतील मराठी माणसाला स्वाभिमानाने जगता यावं यासाठी ५५ वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

हेही वाचा : VIDEO: “सकाळी ९ वाजता एक भोंगा सुरू होतो आणि रात्री…”; परभणीत देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

“बुळचट मिंधे सरकार महाराष्ट्राचा अपमान उघड्या डोळ्यांनी पाहतंय”

“आज त्या स्वाभिमानावर मोदी-शाहांच्या सरकारने बुलडोजर फिरवण्याचं काम केलं. हे मिंधे सरकार बुळचट सरकार महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान उघड्या डोळ्यांनी पाहतं आहे,” असाही आरोप राऊतांनी केला.

Story img Loader