पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान’ या वक्तव्यावर हल्ला चढवत ‘काँग्रेस लुट की दुकान, झुठ का बाजार हैं’ असं म्हणत टीका केली. यानंतर आता शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या या वक्तव्यावर सडकून टीका केली. तसेच मोदींनी लुटीचं आणि खोटेपणाचं दुकान काय आहे हे पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात येऊन पाहावं, असं सुनावलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘लुट की दुकान, झुठ का बाजार हैं’ असं स्वतःबद्दल बोलत आहेत. त्यांनी चुकीने काँग्रेसचं नाव घेतलं आहे. लुटीचं आणि खोटेपणाचं दुकान काय आहे हे पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात येऊन पाहावं. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात लूट करणाऱ्यांचं आणि खोटं बोलणाऱ्यांचं राज्य आहे. हे मोदीच चालवत आहेत.”

हेही वाचा : “मैं नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान…”, ‘भारत जोडो’ यात्रेबाबत राहुल गांधींचं विधान

“कालपर्यंत जे लूट करणारे, खोटं बोलणारे आज भाजपाचे नेते आणि मंत्री”

“कालपर्यंत जे लूट करणारे होते, खोटं बोलणारे होते ते आज भाजपाचे नेते आणि मंत्री झाले आहेत. मोदी कोणत्या काँग्रेसविषयी बोलत आहेत. काँग्रेस तर सध्या दोन चार राज्य सोडले तर सत्तेत नाही,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.