दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवल्यामुळे आज महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. आज मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राचा विजय!’ राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, “महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना…”

Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : ‘महायुतीला किती जागा मिळतील?’ एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही…”
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?

काय म्हणाले संजय राऊत?

एकनाथ शिंदे यांना कोणीही मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत. पहिल्या १० मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव नाही, हे दुर्देवं आहे. महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे. मात्र, गेल्या सहा-सात महिन्यांपासून महाराष्ट्र हे या देशाच्या खिजगंटीत अजिबात नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यानंतर ते चौथ्या क्रमांकावर आले. त्यामुळे त्याचं सरकार पाडण्यात आलं. महाराष्ट्राचे पंख कापले गेले. राज्याच विकास काही लोकांना पाहवत नाही. दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवल्यामुळे आज महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा – “हिंमत असेल, तर एकत्र निवडणुका घ्या”, उद्धव ठाकरेंच्या विधानाचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला समाचार; म्हणाले…

पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधींना बजावण्यात आलेल्या हक्कभंग नोटीशीबाबतही प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांना नोटीस बजवण्याचं कोणतही कारण नव्हतं. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलं आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं पंतप्रधानांनी द्यायला हवी होती. त्यांना ती संधी होती. मात्र, त्यांनी या प्रश्नांची उत्तरं न देता हक्कभंग केला आहे. हक्कभंगाची कारवाई तर पंतप्रधान मोदींवर व्हायला हवी होती. मात्र, ती राहुल गांधींवर झाली. यालाच हुकूमशाही म्हणतात, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस हे हवेतील…”; अमोल मिटकरींची खोचक टीका; नव्या राज्यपालांबाबतही केलं भाष्य; म्हणाले, “महाराष्ट्रात येण्यापूर्वी…”

भाजपा कार्यकारणीच्या बैठकीतबाबत बोलताना ते म्हणाले, भाजपाने कितीही ठराव पारीत केले, तरी मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच विजय होईल. ज्या मुख्यमंत्र्यांचा समावेश पहिल्या १० मुख्यमंत्र्यांमध्येही होत नाही, त्यांच्या नेतृत्वात जर भाजपा लढणार असेल, तर कोणत्याही महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा विजय होणं शक्यच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.