महाराष्ट्र सरकारने रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटताना दिसून येत आहेत. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकास्र सोडलं. तसेच श्रीसेवकाच्या मृत्यूचा आकडा ५०च्यावर गेला आहे, असा दावाही त्यांनी केला. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – खारघर उष्माघात प्रकरणातील मृतांचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; डॉक्टर म्हणतात, “त्यांच्या शरीरात…”!

Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Navneet Rana on Uddhav Thackeray
Navneet Rana : “मी बाळासाहेबांची मुलगी…”, अमरावतीतील राड्याप्रकरणी नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर तोफ; म्हणाल्या…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
bjp leader Kiren rijiju
“राहुल गांधी अजुनही अपरिपक्व नेते”, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची टीका
Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका

काय म्हणाले संजय राऊत?

“खारघर येथे श्रीसेवकांचा पाण्याशिवाय तडफडून मृत्यू झाला. काही कायकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा ५०च्यावर गेला आहे. मात्र, सरकार हा आकडा लपवते आहे. पाणी मागण्याऱ्या श्रीसेवकांचे बळी या सरकारने घेतले आहेत”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा – “जळगावमध्ये संजय राऊतांनी चौकटीत बोलावं, नाहीतर सभेत…”, गुलाबराव पाटलांचा इशारा

“हे फडणवीसांचं ढोंग आहे”

“खारघरमधील घटनेवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला तर बूच लागलं आहे. पालघरमध्ये जमावाने तीन साधूंची हत्या केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष डहाणूमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यांनी याचं देशभरात राजकारण केलं. पण ज्या ५० श्रीसेवकांचा मृत्यू झाला, त्यांच्यासाठी फडणवीसांच्या डोळ्यात साधी सहानुभूतीही दिसत नाही. ज्या लोकांनी साधूंच्या हत्येनंतर छाती पिटली, ते लोक आज खारघरमधील ५० जणांच्या मृत्यूनंतर गप्प बसले आहेत. आता देवेंद्र फडणवीसांची माणुसकी मेली आहे का?” अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – “महाराष्ट्र सरकार जनतेलाच घाबरू लागलंय”, नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांचं ट्वीट; म्हणाले, “इथे मोगलाई…!”

“हे सरकार निर्दयी, सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”

“या घटनेतील मृत्यूंचा आकडा पुढे येऊ नये, यासाठी पैशांच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर सुरू आहे. श्रीसेवकांच्याबाबत चर्चा होऊ नये, त्यांच्या कुटुंबियांनी जास्त काही बोलू नये, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो आहे. ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यांचे शवविच्छेदन अहवालही समोर आले आहेत. त्यानुसार हे लोक उपाशी होते. त्यांच्या पोटात पाणी सुद्धा नव्हतं. त्यांच्या खाण्यापिण्याची कोणतीही सोय या सरकारने केली नव्हती. इतकं निर्दयी हे सरकार आहे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही”, असेही ते म्हणाले.

नितीन राऊतांवरील कारवाईवरून शिंदे सरकारवर टीकास्र

पुढे बोलताना त्यांनी नितीन देशमुखांवरील कारवाईवरूनही शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं. नितीन देशमुख पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढत होते. त्याचा सरकारला त्रास व्हायचं कारण काय? बाळापूर भागातील तीन महिन्याचं बाळही खारयुक्त पाणी पिते. या पाण्यामुळे लोकांचं जीवन संकाटत आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाण्याची योजना मंजूर केली होती. मात्र फडणवीसांनी त्या योजनेवर स्थगिती आणली. नितीन देशमुख हेच खारयुक्त पाणी फडणवीसांना दाखवण्यासाठी नागरपूरला जात होते होते, पण सरकारने त्यांना अडवलं. राज्यात नेमकं चाललंय काय? हे सरकार मोगलाई परत आणताय का? असं ते म्हणाले.