शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटक केली. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ते त्यांची पापं लपवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकत आहेत, असा आरोप केला. तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणी केली. यावर आता शीतल म्हात्रेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले होते, “या वादग्रस्त व्हिडीओशी महाविकासआघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा काडीचाही संबंध नाही. ते त्यांची पापं लपवण्यासाठी, त्यांचे गुन्हे लपवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकणार असतील तर ते कायद्याचं राज्य नाही.”

“सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करण्यांवर गुन्हे दाखल करा”

“मी तो व्हिडीओ पाहिलेला नाही. माझ्या सकाळीच त्याविषयी वाचनात आलं. मुळात सार्वजनिक कार्यक्रमात कुणी अशाप्रकारचं अश्लील वर्तन करत असेल, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवेत,” असं संजय राऊत म्हणाले होते.

शीतल म्हात्रेंच्या व्हायरल आक्षेपार्ह व्हिडीओवर अजित पवारांची प्रतिक्रिया

अजित पवार म्हणाले, “राजकीय क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वतःचं चारित्र्य चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण लोक आमच्याकडे ‘पब्लिक फिगर’ म्हणून पाहत असतात. त्यामुळे राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात, मतमतांतरं असू शकतात. त्याबद्दल मला खोलात जायचं नाही.”

हेही वाचा : शीतल म्हात्रेंच्या आक्षेपार्ह व्हिडीओवर रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मिरवणुकीत असं कोणतंही कृत्य…”

“‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालं पाहिजे”

“कुठल्याही लोकप्रतिनिधीने काही केलं नसताना कुणी जाणीवपूर्वक असे प्रकार केले, त्यामागे कुणी मास्टरमाईंड असेल, तर आमचं स्पष्ट मत आहे की, याची चौकशी झाली पाहिजे. ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालं पाहिजे. वस्तूस्थिती काय आहे हे लोकांना आणि सभागृहाला कळली पाहि,” अशी मागणी अजित पवारांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut demand fir against sheetal mhatre for obscene behavior in public space over viral video pbs