शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आता सामुदायिक हत्याकांड होऊ शकतं, अशी भीती व्यक्त केली आहे. तसेच बारसूच्या माळरानावर जमलेल्या आंदोलकांना तुमच्यावर गोळ्या झाडू, अशा धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप केला. यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बारसूत जाऊन तेथील नागरिकांवर रोखलेल्या बंदुका पाहाव्यात, असंही म्हटलं. ते मंगळवारी (२५ एप्रिल) पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “लोकांचा विरोध आहे. कालपासून ५-६ हजार लोक बारसूच्या माळरानावर जमले आहेत. आम्ही गोळ्या खाऊ, मरू, पण येथून हटणार नाही, असं ते म्हणत आहेत. या राज्याचे उद्योगमंत्री पोलिसांना हाताशी धरून बारसूच्या आंदोलकांना तुमच्यावर गोळ्या झाडू अशा धमक्या देत आहेत. मात्र, स्थानिकांचा जमीन अधिग्रहणाला विरोध आहे. अनेक कुटुंबं परागंदा झाली आहेत. अनेकांना पोलीस स्टेशनला बोलावून २४-२४ तास बसवून ठेऊन धमक्या दिल्या जात आहेत.”

Aditya Thackeray
नवी मुंबई विमानतळावरील चाचणीवरून आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “वायुदलाचा वेळ अन्…”
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
eknath shinde
Ratan Tata Death : “नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश अन् समाजाचा विकास करण्याची विचारधारा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली!
uddhav thackeray criticized mahayuti government
न्यायदेवतेवर विश्वास पण दोन वर्षे न्याय मिळाला नाही! उद्धव ठाकरे यांची खंत
ajit pawar nitin gadkari ladki bahin yojana statement
“…तर आम्ही लाडकी बहीण योजना सुरुच केली नसती”; नितीन गडकरींच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया
praful patel on raj thackeray ladki bahin statement
राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “ज्या लोकांना सरकारची…”
Sarsanghchalak Mohan Bhagwat appeal to the bjp new generation regarding Pt DeenDayal Upadhyay
भाजपच्या आजच्या पिढीने दीनदयाळजींचे गुण अंगीकारावेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
नव्यांचे लाड करताना जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी द्या! भाजप नेत्यांची नेतृत्वाकडे मागणी

“हजारो लोकांना तडीपारीच्या नोटीस, धमक्या, अटक”

“बारसू, राजापूर आणि आसपासच्या भागात हजारो लोकांना तडीपारीच्या नोटीस दिल्या जात आहेत. इतकं नव्हे, तर पोलीस लाथा मारून प्रकल्पाला विरोध असणाऱ्या आणि मुंबईत राहणाऱ्या बारसूच्या नागरिकांच्या घरात घुसत आहेत. त्यांना धमक्या देत आहेत.मुंबईतील बारसूच्या रहिवाशांनाही अटक केली जात आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला.

हेही वाचा : “राजकारणात पुतण्यांनी घोटाळा करून ठेवलाय”, म्हणून अजित पवारांना आव्हान? राऊतांच्या विधानावर भाजपाची प्रतिक्रिया, म्हणाले…

“तर त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जातील”

संजय राऊत पुढे म्हणाले, “हे अत्यंत विकृत, दहशतवादी मनोवृत्तीचं सरकार आहे. बारसूच्या माळरानावरील हजारो लोक मागे हटले नाहीत, तर त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जातील. तसेच जालीयनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे बारसूचं हत्याकांड होईल की काय अशी मला भीती वाटते आहे. म्हणून उद्धव ठाकरे या प्रकरणात लक्ष घालत आहेत. कदाचित मुंबईला त्यात लक्ष घालावं लागेल आणि आम्हाला तिकडे जावं लागेल. आम्ही जनतेबरोबर आहोत. जनतेने विरोध केला आहे. जनता छातीवर गोळ्या झेलायला तयार आहे. जनता तुरुंगात जायला तयार आहे. अशावेळी शिवसेना स्वस्थ बसणार नाही.”

“आता सामुदायिक हत्याकांड होऊ शकतं, कारण…”

“याच प्रकरणात शशिकांत वारिसे यांची हत्या झाली. तो मृत्यू नसून रिफायनरी प्रकरणात झालेली हत्या आहे. आता सामुदायिक हत्याकांड होऊ शकतं. कारण त्या भागात महाराष्ट्राबाहेरील अनेक परप्रांतियांना जमिनी घेतल्या आहेत. त्या जमिनीचं मोल कमी होईल. त्यांची गुंतवणूक अडचणीत येईल म्हणून धाकधपटशा करून ती रिफायनरी करण्याचं सरकारचं धोरण आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला.

“तेच हेलिकॉप्टर घेऊन एकनाथ शिंदेंनी बारसूला जावं”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला गोरगरिबांचे कैवारी समजतात. ते हेलिकॉप्टर घेऊन तीन दिवस सुट्टीवर गेलेत. त्यांच्या घराजवळ हेलिपॅड आहे. त्यांनी तेच हेलिकॉप्टर घेऊन बारसूला जावं आणि ७२ तासांपासून बसलेल्या आंदोलकांची अवस्था काय आहे पाहावी. पोलिसांनी कशा बंदुका रोखल्या आहेत, धमक्या देत आहेत हे समजून घ्यावं. देवेंद्र फडणवीसांच्या ह्रदयात थोडी जरी मानवतेची ज्योत असेल तर त्यांनीही जावं आणि काय अवस्था आहे हे पाहावं,” असंही राऊतांनी म्हटलं.