शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्या घराची रेकी झाल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे. खुद्द संजय राऊत व त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी हा दावा केला असून त्यानुसार पोलिसांकडून तपास केला जात आहे. सुनील राऊत यांनी घरातल्या सीसीटीव्हीचं फूटेज पोलिसांना सोपल्याचं सांगितलं असून त्यात दोन बाईकस्वार स्पष्टपणे दिसत असल्याचं सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात या ‘रेकी’ची चर्चा सुरू झाली असून ते दोन बाईकस्वार नेमके कोण होते? याचा तपास पोलीस घेत आहेत.

नेमकं काय झालं?

पत्रकारांनी संजय राऊतांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी त्याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. “सामना कार्यालयाची रेकी होत आहे. माझ्या घराचीही होतेय. दिल्लीतल्या घराचीही रेकी झाल्याचं आता समजलंय. हे सगळं रेकॉर्डवर आहे. पोलीस अधिकारी तपास करत आहेत. उद्धव ठाकरेही पोलिसांशी बोलत आहेत. संतोष देशमुखांसारखे काही प्रकार आणखी काही लोकांना करायचे असू शकतात. बघू. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अजिबात राहिलेली नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

kalyan dispute news akhilesh shukla video
Kalyan Dispute: कल्याण मारहाण प्रकरणी अखेर अखिलेश शुक्लांनी दिलं स्पष्टीकरण; देशमुख कुटुंबानंच पत्नीला शिवीगाळ केल्याचा आरोप!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
mumbai st bus stand closed
मुंबई सेंट्रल एसटी स्थानकातून बस सेवा बंद? बसस्थानक परिसराचे लवकरच काँक्रीटीकरण
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Raj Thackeray On kalyan society dispute
Kalyan Society Dispute : कल्याण मारहाण प्रकरणावर राज ठाकरेंची संतप्त पोस्ट; सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत म्हणाले, “मारहाण झाली त्याची आई-बायको…”
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
cuffe parade National Company Law Tribunal Porn videos courtroom screen
न्यायदालनातील स्क्रीनवर लागली अश्लील चित्रफीत, संगणक प्रणाली हॅक केल्याचा संशय
ajit pawar on kalyan society scuffle viral video news
Video: “तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला…”, कल्याण मारहाण प्रकरणी अजित पवारांनी विधानसभेत मांडली भूमिका!

आज सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. दोन इसम दुचाकीवर येऊन गेटजवळ थांबल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. घराजवळ येऊन थोड्या वेळाने पुन्हा यू टर्न घेऊन ते माघारी गेले. यात बाईक चालवणाऱ्यानं हेलमेट घातलं असून मागे बसलेल्या व्यक्तीनं हुडीचं जॅकेट घातल्याचं दिसत आहे.

सुनील राऊत यांनी दिली सविस्तर माहिती

सुनील राऊत यावेळी घरातच होते असं सांगितलं जात आहे. त्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. “मोबाईलनं ते शूटिंग करत होते. त्यांना हटकल्यानंतर ते दोघं माघारी फिरून पळून गेले. माझ्या घरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाली आहेत. हे वातावरण अत्यंत संशयित आहे. माझ्या घराला दोन गेट आहेत. पुढच्या गेटनंतर ते लोक मागच्या गेटवरही गेले. त्यांच्या मनात काहीतरी वाईट हेतू असावा. मुंबईत बाबा सिद्दिकींची ज्याप्रकारे निर्घृण हत्या केली, तसं इथे काही होऊ नये म्हणून मी पोलिसांना कळवलं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत. शोध घेत आहेत. गेली अनेक वर्षं आम्ही संरक्षण मागतोय. पण दिलं जात नाही. इथे काही वाईट घडलं तर त्याची पूर्ण जबाबदारी सरकारची असेल”, असा इशाराच सुनील राऊत यांनी दिला आहे.

Story img Loader