अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियानचा मृत्यू झाला होता. पण, दिशा सालियानचा बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला होता. याप्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव असल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला होता. यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. आता याप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. दिशा सालियानचा अपघाती मृत्यू झाल्याचं सीबीआय तपासत समोर आलं आहे.

यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे. “भाजपाचे नेते आणि महिला नेत्यांनी आरोप केले होते, त्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागायला हवी. केंद्रीय तपास यंत्रणेचा अहवाल समोर आला आहे, तर तोंडाची थुंकी का उडवत होता. एक तरुण नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला,” असा हल्लाबोल संजय राऊतांनी राणेंवर केला आहे.

हेही वाचा : “सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे, काही बरं वाईट…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “हल्ला व्हावा यासाठीच सुरक्षा काढली”

“दिशा सालियन हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरेंचा हात असल्यानेच याप्रकरणाची दाबादाबी केली. तशी लोकांची चर्चा आहे. सचिन वाझेने हे संपूर्ण प्रकरण मॅनेज केलं,” असा गौप्यस्फोट नारायण राणेंनी केला होता.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा : “…आणि आपल्या सरकारचा मात्र डोळा लागलाय”, सीमाप्रश्नावरून रोहित पवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यात आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने अहवाल सादर केला आहे. त्यानुसार दिशा सालियनचा मृत्यू दारूच्या नशेत तोल गेल्यानं झाल्याचं समोर आलं आहे. दारूच्या नशेत दिशाचा तोल गेल्याने ती १४ व्या मजल्यावरून खाली पडली. यामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सीबीआयने अहवालात म्हटलं आहे.