विधानसभा, लोकसभा निवडणुकांमुळे संपुर्ण राज्यात आचारसंहिता लागू असते. तर दर पाच वर्षांनी राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे फेब्रुवारीत जवळपास संपुर्ण महाराष्ट्रात निवडणुक प्रचार सुरु झालेला असतो. मात्र ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे राज्यात १४ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे खास करुन स्थानिक नेत्यांचे लक्ष लागलेले आहे.

राज्यात मुंबई महानगरपालिकेसह, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, अकोला, सोलापूर, अमरावती, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड या प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत महिन्यात होणे अपेक्षित होते. एवढंच नाही तर २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसह १०० पेक्षा जास्त पंचायत समित्यांच्या निवडणुका या २०१७ ला फेब्रुवारी महिन्यात झाल्या होत्या. आता पाच वर्ष होत असतांना या निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर कल्याण डोंबिवली, कोल्हापूर, नवी मुंबई, औरंगाबाद या महानगपालिकांची मुदत केव्हाच संपली असून या महापालिकाही निवडणुकांच्या प्रतिक्षेत आहेत. या सर्व निवडणुकांबाबत अजुन कोणतीही घोषणा झालेली नाहीये. त्यातच बदललेल्या सत्ता समिकरणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे गणितही पुर्णपणे बदलून गेलेले आहे. यामुळे या भागातील सर्वच स्थानिक लोकप्रनिधी, राजकीय पक्षांचे लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे.

Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
संजय राऊतांच्या विधानाने युतीच्या चर्चेला बळ
घरगड्यांच्या गर्दीत सामील भाजपाई
घरगड्यांच्या गर्दीत सामील भाजपाई
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Adinath Sugar Factory Election is soon to be in karmala
‘आदिनाथ’ला निवडणुकीचे वेध; करमाळ्याचे राजकारण पेटणार
Rahul Gandhi
Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग; राहुल गांधींनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट, काँग्रेस- आरजेडीच्या आघाडीला बळ मिळणार?

असं असतांना पुढील महिन्यात निवडणुका होत असल्यानेच यशवंत जाधव यांच्यावर घरी धाडी पडल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी आज केलं आहे. मुंबई पालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून धाड टाकण्यात आल्याच्या पार्श्वभुमिवर संजय राऊत यांनी हे व्यक्तव्य केलं आहे. तेव्हा आता खरोखर पुढील महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांची घोषणा केली जाते का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

करोनाचे सावट आता मोठ्या प्रमाणात दूर झाले असून संपुर्ण महाराष्ट्रातील निर्बंध जवळपास उठवण्यात आलेले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. तेव्हा सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आणि त्यावर आधारीत राज्य निवडणुक आयोग काय निर्णय घेतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

Story img Loader