पत्राचाळ घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. साधारण १०० दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर ते आज (१० नोव्हेंबर) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी संजय राऊत यांचे स्वागत करण्यासाठी आदित्य ठाकरे घराबाहेर आले. विशेष म्हणजे संजय राऊतांजवळ येताच आदित्य ठाकरे यांनी त्यांची आनंदाने गळाभेट घेतली. त्यानंतर आदित्य ठाकरे संजय राऊत यांना मातोश्रीवर घेऊन गेले.
हेही वाचा >>> जामिनावरून सुटताच संजय राऊतांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक, म्हणाले “लवकरच देवेंद्र फडणवीसांची…”
संजय राऊत जामिनावर बाहेर आल्यामुळे उद्धव ठाकरे गटातील नेते तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. उद्धव ठाकरे समर्थकांकडून कालपासून राज्यभरात जल्लोष केला जात आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊत यांनी आज मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरेंची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांच्या स्वागतासाठी खुद्द आदित्य ठाकरे घराबाहेर आले होते. यावेळी संजय राऊतांजवळ पोहोचताच त्यांनी राऊतांची आनंदाने गळाभेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
हेही वाचा>>> “औरंंगजेब, अफजलखानाच्या कबरी उद्ध्वस्त कराव्यात, अन्यथा…” हिंदू महासंघाचा राज्य सरकारला इशारा
जामिनावर सुटल्यानंतर संजय राऊत यांनी आज उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीदेखील भेट घेणार आहेत. आगामी काळात ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहेत. विशेष म्हणजे राऊतांनी फडणवीसांचे तोंडभरून कौतूक केले आहे. सध्याच्या सरकारने बरेच चांगले निर्णय घेतले आहेत. आम्ही विरोधाला विरोध करणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.