बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील एका भूखंडाच्या फसव्या एफएसआय (फ्लोअर स्पेस इंडेक्स) विक्रीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केल्यानंतर प्रवीण राऊत यांना अटक केली. एक हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ही अटक करण्यात आली आहे. प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण यांचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी २०१० मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे यंत्रणेच्या तपासात समोर आले होते. ज्याचा वापर मुंबईतील दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला गेला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“या सरकारमध्ये विरोधकांचे नातेवाईक यांच्यावर कारवाई होत असतात आणि आमच्या सारखे लोक नेहमी सहन करत असतात. २०२४ पर्यंत आम्ही हे सहन करु. राजकीय सुड बुद्धीच्या या कारवाया होत आहेत. त्यांचा तपास आमच्याभोवती सुरु आहे. मी त्यांना विचारतो कुछ मिला क्या. हा एक खेळ सुरु आहे,”अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; दोन आरोपींना अटक, एका पीएसआयचं निलंबन
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​माजी संचालक प्रवीण राऊत यांना पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली १०४० कोटी रुपयांच्या म्हाडाच्या जमीन घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने राऊतला आठ दिवसांची ईडी कोठडी सुनावली. ईडीने सांगितले की, राऊत यांना मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक करण्यात आली आहे.

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेतील ४,३०० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी एचडीआयएल ईडीसह इतर काहींची ईडी चौकशी करत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार,  ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशीनंतर प्रवीण राऊतला अटक करण्यात आली. मंगळवारी ईडीने महाराष्ट्रातील राऊत यांच्या काही ठिकाणांवर छापे टाकले होते.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) उपनगरीय मुंबईतील चाळीचा पुनर्विकास करण्याचे कंत्राट दिल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. त्यात या प्रकल्पाच्या एफएसआयच्या विक्रीत अनियमितता आढळून आली. एजन्सीने गेल्या वर्षी पीएमसी बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

Story img Loader