धूलिवंदनाच्या कार्यक्रमादरम्यान माध्यामांशी संवाद साधताना आम्ही विरोधकांना माफ केलं आणि कटुता संपवली, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – “नव्या दमाने, नव्या आयुधांसह, नवनिर्माणास सज्ज”; मनसेचा आज १७वा वर्धापन दिन; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”

काय म्हणाले संजय राऊत?

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, “भाजपाने आम्हाला माफ करावं, अशी मागणी कोणी केली नव्हती. याउलट त्यांना माफ करणायचं की नाही, हे आम्ही ठरवणार आहे. ज्यापद्धतीने त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसांच्या स्वाभिमानासाठी काम करणार एक हिंदुत्त्ववादी पक्ष त्यांनी फोडला, हा महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. त्यांनी ज्याप्रकारे हा गुन्हा केला आहे, राज्यातील जनता हे कधीच विसरणार नाही आणि भाजपाला कदापी माफ करणार नाही”

“हा राज्याचा काळजात केलेला घाव आहे”

पुढे बोलताना, “तुम्ही माफीचं वाटप करायला बसला आहात का? मुळात तुम्ही ज्याप्राकारे पक्ष फोडला, हा राज्याचा काळजात केलेला घाव आहे, हे महाराष्ट्र सहजासहजी विसरणार नाही आणि शिवसेना कधीच विसरणार नाही”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – “नव्या दमाने, नव्या आयुधांसह, नवनिर्माणास सज्ज”; मनसेचा आज १७वा वर्धापन दिन; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

“भाजपाशी कधीधी मैत्री होणार नाही”

यावेळी भाजपाने मैत्रीचा हात पुढे केला, तर भाजपाशी मैत्री होईल का? असं विचारलं असता, “भाजपाशी कधीधी मैत्री होणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो आहे. कारण राजकारणार मतभेद होत असतात. यापूर्वी अनेकदा अनेकदा टोकाचे मतभेत झाले आहेत. पण त्यांनी बाळासाहेबांचा पक्ष फोडला आणि चोरांच्या हातात दिला. त्यामुळे त्यांना जनताही माफ करणार नाही”, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा लागालॅंडमध्ये भाजपाला पाठींबा, राऊत म्हणाले…

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने लागालॅंडमध्ये भाजपाला पाठींबा दिला आहे. यासंदर्भातही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “तिथे भाजपानं सत्ता स्थापन केलेली नाही. तिथल्या प्रादेशिक पक्षाचे नेते रिओ, जे आमच्याबरोबर संसदेत काही काळ खासदारही होते, त्यांच्या पक्षाला २५ ते २६ जागा मिळाल्या आहेत. त्यांचा मुख्य पक्ष आहे. नागालँड हे सीमेवरचं राज्य आहे. संवेदनशील आहे. ते काश्मीरपेक्षा जास्त संवेदनशील राज्य आहे. तिथेही दहशतवाद, इतर कारवायांचा धोका असतो. रिओ यांच्या पक्षाबरोबर भाजपाची युती होती. भाजपाला १० ते १२ जागा मिळाल्या आहेत. इतर अनेक लहान पक्ष आहेत. त्या सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार बनवलंय”, असं ते म्हणाले.

हेही वाचा – …म्हणून नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजपासह सरकारमध्ये? संजय राऊतांनी मांडली भूमिका; म्हणाले, “आज चर्चा होईल!”

“आज मविआमध्ये चर्चा होईल”

“नागालँडची भौगोलिक आणि सुरक्षाविषयक परिस्थिती अनेकदा काश्मीरपेक्षा अत्यंत गंभीर असते. तिथल्या मुख्य पक्षाचं सरकार आहे, सरकार भाजपाचं नाही. भाजपा त्यांच्यासह सरकारमध्ये इतर पक्षांसमवेत सामील झाला आहे. पण हरकत नाही, आज महाविकास आघाडीची यासंदर्भात चर्चा आहे. त्यावेळी हा विषय चर्चेत येईल”, असंही संजय राऊतंनी नमूद केलं.