सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयाकडून सीबीआयकडे सोपवण्यात आलेल्या रिपोर्टवरून, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे. जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर मी आम्ही नि:शब्द आहोत. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“अगदी सुरुवातीपासूनच या प्रकरणात महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर मी आम्ही नि:शब्द आहोत. एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाचे प्रमुख असेलल्या डॉ. सुधीर गुप्ता यांचा हा रिपोर्ट आहे. ज्यांचा कोणताही राजकीय संबंध नाही किंवा शिवसेनशी देखील संबंध नाही.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम रिपोर्ट मध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला व सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

आणखी वाचा- “गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणतं प्रायश्चित्त घेणार”; शिवसेना संतापली

एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.

Story img Loader