माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केल्यास शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही, असं विधान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं, असे ते म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलते होते.
हेही वाचा – “किरीटभाऊ बंगल्यांची चौकशी करण्याचा मूड झाला असेल, तर मुख्यमंत्र्यांकडेही…”; सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
काय म्हणाले संजय राऊत?
“दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करायला हवं. दीपक केसरकरांनी जे विधान केलं आहे, त्यावरून त्यांच्या गटात आणखी काही गट निर्माण झाले असं दिसतं आहे. अब्दुल सत्तार यांनीही म्हटलंय की माझ्या गटातले लोकं माझा करेक्ट कार्यक्रम करत आहेत. यावरून तुम्ही याचा अर्थ समजून घ्या. त्यांच्या गटात काय वाद सुरू आहेत, हे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. हे सरकार जास्त काळ टीकणार नाही, हा गटही टीकणार नाही. यापैकी बरेच लोकं भाजपात प्रवेश करतील. तेच त्यांचे अंतिम ध्येय आहे. कारण त्यांना आता शिवसेना स्वीकारणार नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – Rajasthan Train Accident : मुंबई-जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले; १० प्रवासी जखमी
“दीपक केसरकर यांनी एकत्र येण्याची केलेली भाषा हे त्यांच्या गटातील वैफल्य आहे. मी फ्रेब्रुवारीमध्ये सरकार पडेल, असे बोललो होतो. त्यामुळेच केसरकर आता एकत्र येण्याची भाषा करत आहेत. लवकरच १६ आमदार अपात्र ठरतील. आमची कायदेशीर बाजू भक्कम आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – बाळासाहेबांच्या शिवसेनेतील धुसफूस चव्हाट्यावर
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावरूनही त्यांनी टीका केली. विधानसभेत बोलताना महाराष्ट्राच्या विकासावर आणि जनतेच्या मुद्यांवर बोलण्याची संधी मुख्यत्र्यांना मिळत असते. मात्र, मुख्यमंत्री जर विधानसभेत दुखाळा-पाखाळा काढायला लागले. तर राज्याच्या विकासावर कोणी बोलायचं? शिंदेंच विधानसभेतील भाषण हे गल्तीतलं भाषण होतं. मुख्यमंत्री विधानसभेत बोलताना परिस्थितीचे भान ठेऊन बोलावं, असे ते म्हणाले.