पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केल्यानंतर आज राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. राज्याचं नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत, असं राऊत म्हणाले. “उपमुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करत आहेत. मी लवकरच त्यांची भेट घेणार आहे,” असं राऊत म्हणाले. यावर पत्रकारांनी एकीकडे उद्धव ठाकरे गटाकडून टीका होत असतानाच तुम्ही फडणवीसांची भेट घेणार असल्याचं म्हणत आहात असं विचारलं असता या प्रश्नावरही राऊत यांनी उत्तर दिलं. तसेच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “ज्यांनी शिवसेना फोडली, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं त्यांच्या…”; तुरुंगातून बाहेर पडताच संजय राऊतांचा CM शिंदेंवर हल्लाबोल

Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
raosaheb danve compared himself as shivaji maharaj
“मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब”; रावसाहेब दानवेंचं विधान!
Mallikarjun Kharge marathi news
Mallikarjun Kharge: केवळ सवंग घोषणा नकोत! मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला
What Sada Sarvankar Said?
Sada Sarvankar : “मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही, माहीमधून लढणार आणि…”; सदा सरवणकर यांचं वक्तव्य
Bandra East Former Congress MLA Zeeshan Siddique (left). (Photo Credit: Instagram/Zeeshan Siddique )
Zeeshan Siddique : “मविआने मला शब्द दिला होता आणि उद्धव ठाकरेंनी..”; झिशान सिद्दिकी काय म्हणाले?
devendra fadnavis and dawood
Nawab Malik : नवाब मलिकांचा भाजपा नेत्यांना इशारा; म्हणाले, “दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांविरोधात…”
neelam kothari
पतीने चित्रपटासाठी इंटिमेट सीनचे शूटिंग केल्यावर नीलम कोठारी झालेली नाराज; अभिनेता म्हणाला, “तिला एका मैत्रिणीने…”

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी तुरुंगातील दिवसांबद्दल भाष्य करतानाच मुख्यमंत्री शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याबद्दल आपल्या मनात तिळमात्र शंका नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी फडणवीस यांनी घेतलेले काही निर्णय योग्य असल्याचं सांगत फडणवीसांचं कौतुक केलं आहे. “राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय चांगले घेतले आहेत. मी विरोधाला विरोध करणार नाही. गरिबांना घरं देण्याचा प्रयत्न, म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय मला चांगला वाटला. चांगल्या निर्णयांचं स्वागत केलं पाहिजे,” असं राऊत म्हणाले.

राऊत यांनी फडणवीसच राज्याचं नेतृत्व करत असल्याचं म्हणत शिंदेंना टोला लगावला. “नेतृत्व फडणवीस करत आहेत. उपमुख्यमंत्रीच सगळीकडे दिसतात. निर्णय घेतात. मी त्यांना लवकरच भेटणार आहे,” असं राऊत म्हणाले. ठाकरे गटाकडून टीका होत असताना फडणवीसांना भेटण्याबद्दल तुम्ही बोलताय असं विचारलं असता राऊत यांनी, “उपमुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा नसतो तो राज्याचा असतो,” असं सांगितलं.

इतकच नाही तर पुढे बोलताना राऊत यांनी, “प्रधानमंत्री देशाचे असतात. मी मोदी, शाहांना दिल्लीत जाऊन भेटणार आहे. त्यांना माहिती देणार आहे की नेमकं माझ्याबरोबर काय घडलं,” असंही म्हटलंय.