शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी आणि किरीट सोमय्या यांची फार जुनी दोस्ती आहे. त्यामुळे चोक्सी जिथं लपलाय तिथं सोमय्या आणि त्यांचा मुलगा लपला नाही ना? असा सवाल संजय राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी या घोटाळ्याला भाजपाचा पाठिंबा आहे का? याबाबत भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही केली.
संजय राऊत म्हणाले, “किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या या दोघांचे संबंध पीएमसी बँक घोटाळ्यातील सूत्रधार राकेश वाधवानसोबत होते हे आपण सिद्ध केलंय. यांची एक माफिया टोळी वेगवेगळ्या युक्ती वापरून लोकांना बिल्डरांना ब्लॅकमेल करून पैसे काढत होते. त्यातील आयएनएस विक्रांतचं प्रकरण आम्ही समोर आणलं आहे. पण आता हे महाशय आहे कोठे? हे फरार झाले आहेत.
“सोमय्या मुलासह देशाबाहेर पळून जाण्याची भीती”
“किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी दिल्लीतून दबाव आणत आहेत. त्यांनी खोटी कागदपत्रे तयार केल्याची माझ्याकडे माहिती आहे. त्यांनी आधीच पैसे जमा केल्याचा दावा केला, मात्र ते खोटा आहे. न्यायालयात सत्याचा विजय होईल. आमची न्यायालयं दबावाखाली जाणार नाहीत. फक्त हे दोन लफंगे कोठे आहेत हे पोलिसांना तात्काळ शोधावं लागेल. हे कोठे पळून गेलेत? हे देशाबाहेर पळून जाण्याची मला भीती वाटते. त्यामुळे यांच्याविरोधात तात्काळ लुकआऊट नोटीस काढली पाहिजे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
“भाजपाने विक्रांत घोटाळ्यावर अधिकृत वक्तव्य का केलं नाही?”
संजय राऊत म्हणाले, “मेहुल चोक्सी आणि किरीट सोमय्या यांची फार जुनी दोस्ती. त्यामुळे चोक्सी जिथं लपला आहे तिथं तर हा माणूस आणि त्याचा पोरगा गेला नाही ना? हे जाऊ शकतात. हे घाबरलेले आहेत. भाजपाने या संपूर्ण घोटाळ्यावर आणि किरीट सोमय्या फरार होण्यावर आतापर्यंत अधिकृत वक्तव्य का केलं नाही? भाजपाने यावर वक्तव्य करणं गरजेचं आहे.”
“विक्रांत घोटाळ्याला भाजपाचं अधिकृत समर्थन आहे का?”
“विक्रांत घोटाळ्याला भाजपाचं अधिकृत समर्थन आहे का? हा माझा प्रश्न आहे. मी जे बोलतोय तो माझा व्यक्तिगत आरोप नसून या लोकभावना आहेत, देशभावना आहेत. हा देशाच्या नावाने झालेला घोटाळा आहे. म्हणून आमचा आत्मा तिथतिळ तुटतोय,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं.