महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना वाचविण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांनी केला हे दुदैवी आहे, असे टीकास्त्र सोडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अणे यांना नेमणे हा महाराष्ट्रद्रोह होता व त्यांना वाचविणे हा देशद्रोह असल्याचा आरोप केला. अणे यांनी राजीनामा दिलेला नसून त्यांना हाकलले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अणे यांना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीच्या वेळीच पदावरुन हटवायला हवे होते, अशी टिप्पणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे.
अणे यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना राऊत यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली.

Story img Loader