शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय उखडायचं ते उखडा, बघु कोणात किती दम आहे, असं म्हणत भाजपाला खुलं आव्हान दिलंय. तसेच पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “उद्या (१५ फेब्रुवारी) शिवसेना भवनात सायंकाळी ४ वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद होईल. तेव्हा मी तर असेलच, पण शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार महाराष्ट्रातून येतील. पक्ष म्हणून आम्ही येऊ. केंद्रीय तपास यंत्रणांची शिवसेना, ठाकरे परिवारावर जी काही दादागिरी सुरू आहे, खोट्या आरोपांचा चिखल उडवला जातोय त्या सर्वांना उत्तरं मिळतील.”

jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
Stone pelting at Narsayya Adam house in Solapur
सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक; आघाडीतील वादाला हिंसक वळण, काँग्रेसवर कारवाईची मागणी
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका

“भाजपाचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील”

“काही लोक हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल, अनिल देशमुखांच्या कोठडीच्या बाजूला जाईल असं बोलत आहेत. मात्र, मला असं वाटतं की पुढील काही दिवसात भारतीय जनता पार्टीचे साडेतीन लोक हे अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील. या साडेतीन लोकांना कोठडीत ठेवण्याची तयारी सुरू आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात सुद्धा सरकार आहे हे लक्षात घ्या. हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वात आहे हेही लक्षात घ्या आणि सरकार हे सरकार असतं. पाहू कोणात किती दम आहे. खूप सहन केलं आता उद्ध्वस्त करणार आहे. राजकारणात एक मर्यादा असते, ती मर्यादा ओलांडली गेली आहे.”

हेही वाचा : नेहरुंचं नाव घेऊन काँग्रेसवर निशाणा साधणाऱ्या मोदींना राऊतांचा टोला; म्हणाले, “गोवा स्वतंत्र झाला तेव्हा…”

“मी कोणाविषयी बोलतोय हे सर्वांना माहिती आहे. त्यांची झोप उडाली आहे. तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारच्या धमक्या आम्हाला देऊ नका, आम्ही घाबरणारे नाहीत. मी तर कधीच घाबरणार नाही. जे करायचं ते करा,” असंही राऊतांनी नमूद केलं.